राज्यात सर्वत्र अवकाळीचा विक्रम

राज्यात सर्वत्र अवकाळीचा विक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जानेवारीच्या अवघ्या 23 दिवसांत अवकाळी पावसाने यंदा मोठा विक्रम केला असून, राज्यात सरासरीपेक्षा 170 टक्के, तर देशात 190 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून अवर्षणग्रस्त ठरणार्‍या गडचिरोली जिल्ह्यात 840 टक्के, तर रायगडमध्ये 3 हजार टक्के अधिक पाऊस झाला. यापाठोपाठ धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतही अतिवृष्टी झाली आहे.

मान्सूनचा हंगाम संपल्यावर नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस पडतोच आहे. देशात जानेवारीत 11.30 टक्के इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, यंदा अवघ्या 23 दिवसांत 32.8 टक्के पाऊस झाला. अजून आठ दिवस महिना संपण्यास बाकी आहेत, त्यामुळे ही सरासरी आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

मान्सूनचा हंगाम संपल्यावर नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस पडतोच आहे. देशात जानेवारीत 11.30 टक्के इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, यंदा अवघ्या 23 दिवसांत 32.8 टक्के पाऊस झाला. अजून आठ दिवस महिना संपण्यास बाकी आहेत, त्यामुळे ही सरासरी आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात या ठिकाणी अवकाळीची अतिवृष्टी

रायगड : 3256 टक्के , रत्नागिरी : 1236 टक्के, गडचिरोली : 840 टक्के, चंद्रपूर : 674 टक्के, सिंधुदुर्ग : 240 टक्के, धुळे : 443 टक्के, अमरावती : 208 टक्के, यवतमाळ : 221 टक्के, नागपूर : 311 टक्के, वर्धा : 321 टक्के, गोंदिया : 83 टक्के, पुणे 82 टक्के, नंदुरबार 94 टक्के.

देशाची स्थिती

8 राज्यांत अतिवृष्टी, 2 राज्यांत मुसळधार, एका राज्यात साधारण वृष्टी, 4 राज्यांत कमी पाऊस, 4 राज्यांत खूप कमी पाऊस, तर 18 राज्यांत पाऊस नाही.

देशाचे अतिवृष्टीचे भाग :

उत्तरांचल : झारखंड 129 टक्के, मणिपूर 95 टक्के
उत्तर भारत : उत्तराखंड 247 टक्के, हरियाणा 636 टक्के, दिल्ली 685 टक्के, पंजाब 689 टक्के
मध्य भारत : महाराष्ट्र 170 टक्के, छत्तीसगड 537 टक्के, गुजरात 229 टक्के, मध्य प्रदेश

293 टक्के, ओडिशा 371 टक्के

दक्षिण भारत : आंध— प्रदेश 209 टक्के, तेलंगण 461 टक्के, तमिळनाडू 134 टक्के

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news