Pune Crime : धानोरीत टोळक्याकडून पुन्हा राडा; दोघांना अटक | पुढारी

Pune Crime : धानोरीत टोळक्याकडून पुन्हा राडा; दोघांना अटक

येरवडा, पुणे; पुढारी वृत्तसेवा : धानोरीतील मुंजाबा वस्ती येथे बुधवारी रात्री (दि.१९) तरुणांच्या टोळक्याने हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली (Pune Crime). टोळक्याने दुकानातील सामान, गाड्यांची तोडफोड केली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

MP Shrinivas Patil : सातारचे खासदार श्रीनिवास पाटील कोरोना पॉझिटिव्ह

याच तरुणांनी गेल्या आठवड्यात परिसरात दहशत पसरवली होती. यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बुधवारी रात्री तरुणांनी हत्यारे घेऊन दहशत माजविल्याने व्यापारी तसेच रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या गुंडांना त्वरित अटक न केल्यास दुकाने बंद करुन आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे. धुडगूस घालणाऱ्या दोन जणांना रात्री उशिरा विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)

दहशत माजविणाऱ्या अभी तांबे (१९, रा.मुंजाबा वस्ती), शुभम चिंचोरे (२०, कलवड) या दोघांना अटक केली असून अन्य आरोपींना देखील लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी दिली. व्यापारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले की, मुंजाबा वस्ती येथे मागील शुक्रवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या टोळक्‍याने हातात शस्त्रे घेवुन परिसरात दहशत माजवली. मद्यधुंद अवस्थेत दारु पिउन दुकांनावर टपऱ्यांवर हल्ला केला. हे युवक येथील व्यापाऱ्यांकडे हफ्ते, खंडणी मागत असतात न दिल्यास त्यांना मारहाण करणे, धमकावणे, शालेय विद्यार्थीनींची महिलाची छेडछाड करणे, दुचाकींचे कर्णकर्कश्‍श्‍य आवाज करीत जोरात वाहने चालविणे असे प्रकार करीत आहेत. (Pune Crime)

विश्रांतवाडी पोलिसांनी यावर कोणतीच कारवाई केली नसल्याने, बुधवार (दि.१९) पुन्हा रात्री तरुणांच्या टोळक्याने हातात तलवार, कोयते, दांडके घेवुन काही दुकांनावर, दुचाकीवर दगडफेक केली. अनेक दिवसांपासून वारंवार येथे असे प्रकार घडत असून याचे सीसीटीव्ही फुटेज असुनही या युवकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. युवकांना स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याने या युवकांची हत्यारे घेऊन दहशत माजवण्यापर्यंत मजल गेली असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.

Back to top button