अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर मराठा समन्वयकांना पोलिस बळाचा वापर करुन अटक | पुढारी

अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर मराठा समन्वयकांना पोलिस बळाचा वापर करुन अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या बंगल्यासमोर मराठा समन्वयकांना पोलिस बळाचा वापर  अटक करण्यात आली. या प्रकारानंतर मराठा उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

मराठा समन्वयकांनी अशोक चव्हाणांवर केलेले आरोप…

अशोक चव्हाण यांच्या फसवेगिरीमुळे मराठा समाजात तयार झालेल्या नैराश्यामुळे अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. त्याचबरोबर कोपर्डीच्या भगिनीला अजूनही न्याय मिळालेला नाही. तसेच सारथी शिक्षण संस्थेचा कारभार सुरळीतपणे करण्यातही अशोक चव्हाण यांना जमलेले नाही. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती वाढवणे , रखडलेले जिल्हानिहाय वस्तीगृह प्रश्न, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या नोकरीचा प्रश्न यापैकी एकही प्रश्न अशोक चव्हाणांना सोडवता आलेला नाही, असा आराेप मराठा समन्‍वयकांनी केला आहे.

अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्षपदाचा राजीनामा द्‍यावा

 अशोक चव्हाण यांचा मराठा आरक्षण उपसमिती अध्‍यक्षपदाचा राजीनामा तात्काळ घेऊन त्या ठिकाणी कार्यक्षम मंत्री महोदयांची निवड करावी, अशी मागणी  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्‍यात येणार आहे.अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाचा घात करत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा जर महाविकास आघाडीने घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात तीव्र जनआंदोलन उभे राहिल, असे राजेंद्र कोढंरे, करण गायकर , आंकुश कदम , रघुनाथ चित्रे पाटील , धंनजय जाधव , आप्पा कुडेकर, महादेव देवसरकर यांनी सांगितले..

 

हेही वाचा

Back to top button