pune crime : संतोष जगताप खून प्रकरणातील मास्टर माईंड अटकेत | पुढारी

pune crime : संतोष जगताप खून प्रकरणातील मास्टर माईंड अटकेत

लोणीकाळभोर / पुणे; पुढारी वृत्तसेवा : उरळी कांचन येथे वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरणात मास्टर माईंड विष्णू जाधव यास चौकशीसाठी पुणे पोलिसांनी येरवडा तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. ( pune crime )

नोव्हेंबर २०२१ मध्ये पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळीकांचन येथे वाळू व्यवसायिक संतोष जगताप याच्यावर अंदाधुंद गोळीबार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आदलिंगे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. यात सात आरोपी सुरुवातीला होते. ही संख्या पुढे ९ वर पोहोचली, परंतु या खून प्रकरणात विष्णू जाधव हा मास्टर माईंड असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे ( pune crime )

महादेव आदलिंगे याने आपले साथीदार १.स्वागत बापु खैरे (वय-२५,रा.उरूळी कांचन, हवेली,पुणे) ( मयत-टोळी सदस्य), २. पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय-२९,रा.दत्तवाडी,भवरापुर रोड,उरूळी कांचन, हवेली,पुणे) (टोळी सदस्य), ३.उमेश सोपान सोनवणे (वय-३५, रा.मुंपो.राहु,ता.दौण्ड,जि.पुणे ) (टोळी सदस्य ), ४. अभिजीत अर्जुन यादव (वय-२२,रा.मेडद,ता. बारामती,जि.पुणे) (टोळी सदस्य), ५. आकाश उर्फ बाळु जगन्नाथ वाघमोडे (वय-२८,रा.पटेल चौक, कुर्डुवाडी, ता. माढा,जि.सोलापूर) (टोळी सदस्य), ६. महेश भाऊसाहेब सोनवणे (वय-२८, रा.भांडवाडी वस्ती,राहु,ता. दौण्ड, जि.पुणे ) (टोळी सदस्य) यांचे मदतीने आपली दहशत व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी उमेश सोनवणे याच्या भावाचा २०११ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी व अवैद्य वाळू व्यवसाय करण्याचे उद्देशाने संतोष जगतापला पिस्टल मधून गोळया घालून ठार मारले. ( pune crime )

या आरोपीवर पुणे शहर पुणे रेल्वे, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, सोलापुर व उस्मानाबाद जिल्हा असे विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण १५ गुन्हे दाखल असुन,त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांची लोणी काळभोर परिसरात दहशत आहे, या दहशतीमुळे तक्रार करण्यास कोणाही धजावत नसल्याने त्यांच्या बेकायदेशिर कृत्याना आळा घालण्याकरीता त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

Back to top button