पुणे : मकर संक्रातीला देहूतील मंदिरात भाविकांना प्रवेशबंदी - पुढारी

पुणे : मकर संक्रातीला देहूतील मंदिरात भाविकांना प्रवेशबंदी

देहूरोड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात विशेषतः पुणे व मुबई शहरामध्ये कोरोना विषाणूंचा संसर्गामुळे रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. मकर संक्रांतच्या निमित्ताने देहू मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १४ जानेवारी) रोजी मकरसंक्रांत असल्याने श्रीक्षेत्र देहू व परिसरातील असंख्य भाविक स्वयंभू श्री. विठ्ठल रुक्मिणी आणि जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज यांना “ओवसा ” वाहण्यासाठी श्रीक्षेत्र देहू येथे येत असतात. यामुळे येथे गर्दी होत असते.

याच दरम्यान कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग या गर्दीतून होवू नये म्हणून श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिर व सदेह वैकुंठगमन स्थान मंदिर शुक्रवारी रोजी (सकाळी ५. ते रात्री ८ वाजेपर्यंत) दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती श्री. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व सर्व विश्वस्तांनी दिली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button