आळंदी : माऊलींचे संजीवन समाधी मंदिर मकरसंक्रातीला बंद राहणार | पुढारी

आळंदी : माऊलींचे संजीवन समाधी मंदिर मकरसंक्रातीला बंद राहणार

आळंदी : पुढारी वृत्तसेवा

मकरसंक्रांती निमित्ताने माऊलींना ओवसा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत येत असतात. कोरोनाचा, तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव राज्यभर फैलावत आहे. त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता संभाव्य गर्दी टाळण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने माऊलींचे संजीवन समाधी मंदिर गुरुवार (दि. १३) पासून शनिवार (दि. १५) सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीची माहिती संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे.

या कालावधीत फक्त श्रींचे नित्याचे उपचार आणि परंपरेने होणारे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होतील. या काळात भाविकांना यूटयूब आणि संस्थानच्या फेसबुकवरून ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.

Back to top button