10 th result : मुलीच हुश्शार! पुणे जिल्ह्याचा निकाल 95.83 टक्के

10 th result : मुलीच हुश्शार! पुणे जिल्ह्याचा निकाल 95.83 टक्के

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2024 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 27 मे) जाहीर झाला. यंदा दहावीच्या पुणे विभागाचा निकाल 96.44 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात राज्यातील नऊ विभागांमध्ये पुणे विभाग तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल 95.83 टक्के लागला आहे. सोलापूर जिल्हा दुसर्‍या, तर अहमदनगर जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर आहे. निकालात विभागात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.

पुणे विभागात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 97.13 टक्के, तर मुलांचे 93.85 टक्के आहे. सोमवारी दुपारी एक वाजता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. पुणे विभागातून दोन लाख 64 हजार 525 विद्यार्थ्यांनी दहावीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी दोन लाख 62 हजार 949 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ेन लाख 53 हजार 600 इतकी आहे. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 96.44 टक्के आहे. विभागाचे तीन हजार 700 पुनर्परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एक हजार 669 असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 44.38 आहे. नियमित व पुनर्परीक्षार्थींसह पुणे विभागाचा निकाल 95.37 टक्के लागला आहे.

दहावीमध्ये पुणे विभागातील 13 हजार 474 विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. विभागात मुली अव्वल ठरल्या. पुणे विभागात यंदाही मुलींचेच वर्चस्व राहिले आहे. यंदा पुणे विभागात पुणे, नगर, नाशिक असे तिन्ही जिल्हे मिळून दोन लाख 74 हजार 611 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख 72 हजार 808 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी दोन लाख 60 हजार 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे पुणे विभागाचा एकूण निकाल 95.37 टक्के लागल्याचे दिसून येत आहे.

पुणे विभागात 13 हजारांवर विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण

पुणे विभागात 10 विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळाले आहेत, तर 13 हजार 474 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 21 हजार 431 विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्के, 27 हजार 892 विद्यार्थ्यांना 80 ते 85 टक्के, 31 हजार 581 विद्यार्थ्यांना 75 ते 80 टक्के, 32 हजार 403 विद्यार्थ्यांना 70 ते 75 टक्के, 31 हजार 13 विद्यार्थ्यांना 65 ते 70 टक्के, 31 हजार 608 विद्यार्थ्यांना 60 ते 65 टक्के, 55 हजार 559 विद्यार्थ्यांना 45 ते 60 टक्के आणि 15 हजार 218 विद्यार्थ्यांना 45 टक्क्यांहून कमी गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्ह्याचा दबदबा कायम

पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक 95.83 टक्के निकाल लागला आहे. त्याचवेळी दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्याचा निकाल 95.25 टक्के लागला आहे. अहमदनगर जिल्ह्याचा निकाल 95.56 टक्के लागला असून, तो विभागातील सर्वांत कमी आहे. पुणे जिल्ह्यातून एक लाख 37 हजार 872 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एक लाख 32 हजार 126 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातून 65 हजार 671 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 62 हजार 552 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातून एकूण 69 हजार 265 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 65 हजार 502 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.

असा आहे पुणे जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल

  • आंबेगाव : 98.07
  • बारामती : 96.92
  • भोर : 96.55
  • दौंड : 92.99
  • हवेली : 96.17
  • इंदापूर : 96.84
  • जुन्नर : 97.07
  • खेड : 96.24
  • मावळ : 95.69
  • मुळशी : 94.79
  • पुरंदर : 97.06
  • शिरूर : 96.90
  • वेल्हा : 97.23
  • पुणे शहर (पश्चिम) – 95.47
  • पुणे शहर (पूर्व) – 94.52
  • पिंपरी-चिंचवड – 96.42
  • एकूण निकाल – 95.83

जिल्हानिहाय निकाल

  • पुणे – 95.83
  • अहमदनगर – 94.56
  • सोलापूर – 95.25

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news