पुणे : आयटीत 1 लाख कोटींची उलाढाल

पुणे : आयटीत 1 लाख कोटींची उलाढाल
Published on
Updated on
दिगंबर दराडे : 
पुणे : गेल्या काही वर्षांत पुणे शहर आयटी हब म्हणून उदयाला आले आहे. हिंजवडी, खराडी, वाकड तळेगाव, मगरपट्टा सिटी, बाणेर परिसरात पुण्यातील आयटी इंडस्ट्रीचा टक्का वाढत असून, तब्बल एक लाख कोटींची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे.
प्रामुख्याने विदेशातील प्रोजेक्टसची राजधानी पुणे बनत आहे. बंगळुरू पाठोपाठ आता पुणे आणि चेन्नईमध्ये आयटीत स्पर्धा वाढली आहे. पुण्यापाठोपाठ हैदराबाद, गुडगाव आदी शहरातही आयटीचा टक्का वाढत आहे.
प्रामुख्याने हार्डवेअर आणि सॉफ्टोवेअरमध्ये मोठी उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. सहा लाख आयटी अभियंते छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये पुण्यात कार्यरत आहेत. कोविडनंतर वर्क फ्रॉम होमने आयटीचे स्वरूप बदलले असले तरी उलाढाल मात्र वाढत असल्याचे आयटी तज्ज्ञांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.  हिंजवडीपासून सुरू झालेला शहरातील आयटीचा प्रवास आता हिंजवडी, औंध, रावेत, बाणेर, बालेवाडी, बावधन, विमाननगर, मगरपट्टा, खराडी आणि कल्याणीनगर सिटीसह पुण्यात पसरला आहे.
 पुण्याच्या विकासात आयटीचा मोठा वाटा आहे. तब्बल एक लाख कोटींपेक्षा अधिकची उलाढाल आयटी क्षेत्रातून होत आहे. यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा यात समावेश आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आयटीचे आयुष्य कमी असले, तरी वाढीचा वेग निश्चितपणे अधिक आहे. 
                                                                                     – डॉ. दीपक शिकारपूर, आयटी तज्ज्ञ
पुण्यासह देशात आयटीमध्ये रोजगाराच्या मोठी संधी उपलब्ध होत आहेत. जगाच्या तुलनेत देशातील आयटीला चांगले दिवस आहेत. आयटीसंदर्भातील स्टार्टअप यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुण्यात छोट्या-मोठ्या तब्बल 500 हून अधिक कंपन्या आहेत. हा आकडा भविष्यात वाढत जाणार आहे. 
                                                                                        – मेहेर पांडे , आयटी तज्ज्ञ
तंत्रज्ञानामुळे डिजिटल क्रांती झाली आहे. तरुणांच्या ज्ञानाला वाव देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही परदेशातील नोकरी सोडून आयटीला ग्रामीण भागात घेऊन आलो. त्या वेळी लोक कुतुहलाने पाहत होते. आता मात्र लोकांनाही आयटीचे महत्त्व समजले आहे. 
                                                                          – रावसाहेब घुगे, आयटी कंपनी चेअरमन
गेल्या काही महिन्यांत पुण्यात सुरू झालेल्या स्टार्टअपची संख्या वाढली आहे. पुण्यातील आयटीमधील भरतीची टक्केवारी वाढत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. आयटीसंदर्भातील स्टार्टअप यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 
                                                                                          –  हर्षा बाळ, आयटी अभ्यासक 
हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news