Parth Pawar Land Deal: अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात; कसा केला कोट्यवधींचा घोटाळा?

Explained Parth Pawar Pune Land Deal: कोरेगाव पार्क येथील 300 कोटींच्या जमीन व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या Amadea Holdings LLP कंपनीचं नाव समोर आलं आहे.
Explained Parth Pawar Pune Land Deal
Explained Parth Pawar Pune Land DealPudhari
Published on
Updated on

Parth Pawar Land Deal Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे सध्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका 40 एकर जमीन गैरव्यवहारामुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. कोरेगाव पार्कमधील महार वतनाची तब्बल ₹1800 कोटींची जमीन फक्त ₹300 कोटींना विकल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर झाला आहे. या व्यवहारात त्यांच्या Amadea Holdings LLP कंपनीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात मुद्रांक शुल्कातील सवलत, आयटी धोरणाचा गैरवापर, आणि मालकी हस्तांतरणातील अनियमितता, असे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले आहेत. विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, हे नेमकं प्रकरण काय आहे, ते आपण समजून घेऊ या.

कोणत्या जमिनीचा वाद आहे?

  • पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातील 40 एकर जमीनचा हा वाद आहे.

  • 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे. 

  • एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क 21 कोटी रुपये भरलं जाणं अपेक्षित होतं,
    पण प्रत्यक्षात फक्त ₹500 शुल्क भरल्याचं समोर आलं आहे.

Parth Pawar Pune Land Deal
Parth Pawar Pune Land DealPudhari

जमीन कोणाच्या ताब्यात होती?

  • ही जमीन पूर्वी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेच्या ताब्यात होती.

  • या जमिनीवर अनेक वर्षे कोणताही सरकारी प्रकल्प न झाल्याने ती मूळ मालकांना परत दिली गेली.

जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया कशी पार पडली?

  • पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने या जमिनीच्या 273 मूळ मालकांकडून “पॉवर ऑफ अटर्नी” घेतली.

  • या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये जमीन विक्री व हस्तांतरणाचे अधिकार देण्यात आले.

  • पण नियमांनुसार 2,000 नंतरची नोटराइज पॉवर ऑफ अटर्नी वैध नाही, तरीही 2006 मध्ये ती करण्यात आली.

  • यामध्ये मालकांना किती मोबदला देण्यात आला, याचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही.

Parth Pawar Pune Land Deal
Parth Pawar Pune Land DealPudhari
Explained Parth Pawar Pune Land Deal
Parth Pawar Land Raw: पार्थ पवार प्रकरणात पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तत्काळ प्रभावनं निलंबित

नवीन खरेदीदार कोण? कोणत्या कंपनीच्या नावाने व्यवहार झाला?

  • 19 वर्षांनंतर या जमिनीचा नवीन खरेदीदार ठरला- Amadea Holdings LLP.

  • या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे: सर्व्हे नं. 132, बी-21, यशवंत घाडगे नगर, शिवाजीनगर, पुणे - 411005.

  • कंपनीचे काम आहे: वाहन दुरुस्ती, मोटरसायकल विक्री, घरगुती वस्तू विक्री अशी आहे.

  • एवढं असूनही या कंपनीनं 300 कोटींचा जमीन व्यवहार केला, पण कंपनीचं भागभांडवल फक्त ₹1 लाख आहे.

Parth Pawar Pune Land Deal
Parth Pawar Pune Land DealPudhari

Amadea Holdings LLP चे संचालक कोण आहेत?

  • कंपनीचे दोन भागीदार —
    (1) पार्थ अजित पवार (अजित पवारांचे सुपुत्र)
    (2) दिग्विजय अमरसिंह पाटील (पार्थ पवारांचे मामेभाऊ)

    दिग्विजय पाटील हे माजी मंत्री राणा जगजितसिंह यांचे चुलत भाऊ असल्याने या प्रकरणात राजकीय नातेसंबंधही जोडले गेले आहेत.

स्टँप ड्युटी टाळण्यासाठी काय युक्ती वापरण्यात आली?

  • 300 कोटींच्या व्यवहारावर लागणारी कोट्यवधींची स्टँप ड्युटी टाळण्यासाठी
    Amadea Holdings LLP ने महाराष्ट्राच्या आयटी धोरणाचा आधार घेतला.

  • आयटी क्षेत्रातील गुंतवणुकीला स्टँप ड्युटी माफ असते, जर प्रकल्प
    “माहिती तंत्रज्ञान किंवा त्यास सहाय्यभूत सेवा” म्हणून पात्र असेल तर.

  • कंपनीने स्वतःला आयटी प्रकल्प म्हणून नोंदवून ही सवलत मिळवण्याचा प्रयत्न केला.

Explained Parth Pawar Pune Land Deal
Parth Pawar Land Fraud : समोर आलेले मुद्दे अत्यंत गंभीर : पार्थ पवारांवरील आरोपांबाबत CM फडणवीस नेमकं काय म्‍हणाले?

कंपनीविषयी सरकारी नोंदी काय सांगतात?

  • Amadea Holdings LLP (LLPIN: AAY-3559) ची स्थापना 27 डिसेंबर 2021 रोजी झाली.

  • कंपनीचे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, पुणे येथे आहे.

  • कंपनीने शेवटचा वार्षिक आर्थिक अहवाल 31 डिसेंबर 2023 रोजी दाखल केला आहे.

  • कंपनीचा ईमेल: pdigvijay668@gmail.com

  • कंपनीचा वर्तमान स्थिती अहवाल: Active

या प्रकरणामुळे विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आर्थिक अनियमिततेचा तपास झाल्यास मुद्रांक शुल्क, मालकी हस्तांतरण आणि सरकारी सवलतींचा गैरवापर या सर्व मुद्द्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news