Palghar News : सार्वजनिक विहिरीवर खासगी कब्जा

काटी ग्रामस्थांचा पंचायत समितीसमोर ठिय्या
Kati Village Water Crisis
Kati Village Water Crisispudhari photo
Published on: 
Updated on: 

वाडा : वाडा तालुक्यातील बुधावली-काटी ग्रामपंचायत हद्दीतील काटी येथे जलस्वराज्य योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरीवर खासगी व्यक्तींनी बेकायदेशीर कब्जा केल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. विहिरीच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून गावकऱ्यांना पाणी भरण्यास मज्जाव केला जात असल्याने आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे असा स्थानिकांचा आरोप आहे. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून स्थानिकांनी वाडा पंचायत समितीवर धडक देत समस्या निवारण करण्याची मागणी केली.

२०१०-११ मध्ये जलस्वराज्य योजनेतून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरीवर गावातील काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या कब्जा केल्याचे संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विहिरीच्या गेटला कुलूप लावल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असून पाणी संतप्त ग्रामस्थानी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Kati Village Water Crisis
Baramati sugarcane rate: बारामतीतील साखर कारखाने ३९०० रुपये पहिली उचल देणार का? शेजारील फलटण तालुक्याने ओलांडलाय टप्पा

गावात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी कुटुंबांना मोठी कसरत करावी लागत आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनाही पाण्याअभावी गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत यापूर्वी तहसीलदार, पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी कळवूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

सार्वजनिक मालकीच्या विहिरीवरील अतिक्रमण तातडीने हटवून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे. पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी जयकुमार जाधव यांना संपर्क केला असता विहिरीच्या जागेचे कोणतेही कागदोपत्री पुरावे आपल्याकडे नसल्याने अडचण झाली असून संबंधितांसोबत याप्रकरणी बातचीत करण्यात आली आहे. पंपामध्ये झालेला बिघाड तातडीने दुरुस्त करून लोकांची सोय केली जाईल असे त्यांनी सांगितले.

Kati Village Water Crisis
Kolhapur News | जुगुळ-खिद्रापूर पुलासाठी आता आरपारची लढाई

जलजीवन संकटात

आधीच दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या वाडा तालुक्यात यावर्षी दुष्काळसदृश स्थिती आहे. जलजीवन योजनेतून १३९ योजना मंजूर आहेत मात्र यातून बहुतांश योजना कुचकामी ठरल्या आहेत. विहिरींच्या जागांचे हस्तांतरण गंभीर मुद्दा असून पाणी पुरवठा विभागाने कात टाकून कामाला लागावे अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.