Vikramgad Navratri: दुर्गामूर्तींना अंतिम रूप देण्याची लगबग; नवरात्रौत्सवाचे लागले वेध

गरबा-दांडियासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन; पर्यावरणपूरक दुर्गामूर्तींनाही मागणी
Vikramgad Navratri
Vikramgad NavratriPudhari
Published on: 
Updated on: 

विक्रमगड: दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यात विविध ठिकाणी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू असून गरबा, दांडिया तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.

नवरात्रोत्सवासाठी दुर्गामूर्ती तयार करणारे कारागीर आणि विक्रेते सध्या अंतिम टप्प्यातील कामांमध्ये व्यस्त असून मूर्तींना आकर्षक रंगसंगती, अलंकार आणि सजावट करून अंतिम रूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Vikramgad Navratri
Thane Palghar Drought: पालघर-ठाणे दुष्काळाच्या यादीबाहेर गेल्याने शेतकरीवर्ग चिंतेत

तालुक्यातील अनेक मूर्ती विक्रेत्यांच्या कार्यशाळांमध्ये दुर्गामूर्तींवर शेवटचा हात फिरताना दिसत असून ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध आकारांच्या आणि आकर्षक मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यंदा पारंपरिक स्वरूपाबरोबरच पर्यावरणपूरक मूर्तींनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Vikramgad Navratri
Palghar Rice Farming: भातपिके सुकू लागली अन् शेतकऱ्यांची चिंता वाढली! कवडास धरणातून ५० क्युसेक पाणी सोडले

नवरात्रोत्सव जवळ येत असल्याने भाविकांकडून मूर्तींची निवड आणि बुकिंग सुरू झाले असून बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी मंडळे, ग्रामस्थ आणि युवक वर्ग तयारीला लागला असून भक्ती, संस्कृती आणि उत्सवाचा रंग चढू लागला आहे. बाजारपेठांमध्येही नवरात्रौत्सवाच्या विविध वस्तू दाखल झाल्या असून महिला खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news