Pre Monsoon Preparation: वसई-विरारमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग! महापौरांकडून पाहणी

आज सकाळी विरार येथील विविध विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व कामांचा सविस्तर आढावा घेतला.
Pre Monsoon Preparation
Pre Monsoon PreparationPudhari
Published on
Updated on

वसई: पावसाळा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व कामांचे नियोजन अत्यंत वेगाने सुरू करण्यात आले आहे. याच नियोजनाचा एक भाग म्हणून वसई-विरार शहराचे महापौर अजीव पाटील यांनी आज सकाळी विरार येथील विविध विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यामध्ये प्रामुख्याने विरार ग्लोबल सिटी परिसरातील रस्ते पॅचवर्क, नारिंगी रेल्वे उड्डाणपूल आणि शहरातील नालेसफाईच्या कामांचा समावेश होता. आगामी पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पालिकेने हाती घेतलेली ही मान्सूनपूर्व कामे दिलेल्या मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश महापौर अजीव पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Pre Monsoon Preparation
Tukaram Mundhe FDA Action: तीन दिवसांत 33 अटकेत, 25 एफआयआर; अन्न व औषध प्रशासनात तुकाराम मुंढे पॅटर्न

या पाहणी दौऱ्यादरम्यान महापौरांसोबत बहुजन विकास आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी प्रत्यक्ष महापौरांची भेट घेऊन परिसरातील विविध समस्या मांडल्या आणि काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. नागरिकांच्या या सूचनांचे महापौरांनी स्वागत केले असून, त्या अनुरूप तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

पावसाळ्यात नालेसफाई वेळेत आणि योग्य पद्धतीने न झाल्यास ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. हाच धोका ओळखून, यंदा कुठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडू नयेत, या दृष्टीने सध्या सुरू असलेले रस्ते पॅचवर्कचे काम तांत्रिकदृष्ट्या चोख व योग्य पद्धतीने व्हावे, अशी तंबीही त्यांनी दिली.

Pre Monsoon Preparation
Gutkha Spitting Action: स्मोकर्ससह पिचकारी बहाद्दरांवर फौजदारी आयुधांचा वापर व्हावा; केडीएमसीची कार्यालये तंबाखूमुक्त करण्याची मागणी

याशिवाय, नारिंगी रेल्वे उड्डाणपूल जरी वाहतुकीसाठी सुरू झालेला असला, तरी त्याची उर्वरित काही कामे अद्याप प्रलंबित आहेत. ही राहिलेली कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून पावसाळ्यात या मार्गावर कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही आणि वाहनचालकांचा प्रवास सुखकर होईल, अशा सूचना महापौर अजीव पाटील यांनी केल्या आहेत. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून मान्सूनपूर्व कामांना आता अधिक गती मिळण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news