Vasai infrastructure issue : वसईच्या नवीन पुलावरील पूर्वेचा रस्ता गायब

नागरिकांचे होणार हाल, राजाराम बाबर यांचे रेल कॉर्पोरेशनला पत्र
Vasai infrastructure issue
वसईच्या नवीन पुलावरील पूर्वेचा रस्ता गायबpudhari photo
Published on
Updated on

वसई : वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जुना पूल आता तोडण्यात आला आहे. यापूर्वी पूर्वेकडील बाजूस पेट्रोल पम्प जवळून उतरण रस्ता होता. परंतु आता नव्या पुलाला हा उतरण रस्ता देण्यात आलेला नसल्याने पूर्वेला औद्यीगिक वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना आणि औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना त्याचा त्रास होणार आहे. रेल कार्पोरेशन बांधत असलेल्या ह्या पुलाच्या डिझाईन बाबत पालिका आंभिज्ञन असल्याचे समजते.

सदरचा जुना पूल बनविण्याची 2017 पासूनची शिवसेनेच्या राजाराम बाबर यांची मागणी होती. त्या मागणीला यश आले असले तरी पूर्वेकडील रस्ताच गायब झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना ,कामगारांना होणार असल्या संधर्बातील पत्र शिवसेनेचे जिल्हा सचिव राजाराम बाबर यांनी रेल कॉर्पोरेशनचे चेअरमन विलास सोपान वाडेकर यांना दिले असून पूर्वेकडे रस्ता ठेवण्याची मागणी केली आहे.

Vasai infrastructure issue
Virar flyover traffic jam : विरार उड्डाणपुलावर कोंडीची समस्या गंभीर

पूर्वी हा पूल महानगरपालिका बांधणार होती. परंतु आता हा पूल रेल कॅर्पोरेशन बांधणार आहे. पालिकेच्या हद्दीतील पूल रेल कॅर्पोरेशन उभारत असली तरी हा पूल कसा आणि किती मोठा उभारणार याबाबत महानगरपालिका अभिन्न असल्याचे दिसत आहे. राजाराम बाबर यांनी रेल कॅर्पोरेशनच्या चेअरमनना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, हा पूल रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे वसई पूर्व पश्चिम जोडणारा वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील जुना खाडीवरील पुलाचे काम हात्ती घेण्यात आले आहे.

या पुलाला पूर्वी इंडियन ऑईल जवळून पूर्वेला येण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला होता. त्याचा फायदा पूर्वेकडील औद्योगिक वसाहत रहिवासी क्षेत्र व पेट्रोल पंप, नवघर पूर्व स्मशानभूमीमध्ये येण्यासाठी होत होता. परंतु आता आपण तयार करीत असलेल्या पुलाला पूर्वेकडे जाण्यासाठी मार्ग ठेवला नसल्याचे समजते. भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील 50 वर्षाचे नियोजन पाहता व होणारी वाहतूक समस्या लक्षात घेता हा रस्ता इंडियन ऑईल पंपाकडून ठेवण्यात यावा. जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही. आपण आमच्या या मागणीचा विचार करावाअशी विनंती त्यांनी शेवटी केली आहे.

पूर्वी असलेला जुना पूल हा सात मित्र रुंद होता तर आता तो 11 मित्र करण्यात आला असल्याने पूल जवळ सुरु असलेले नरवीर चिमाजी आप्पाच्या स्मारकाच्या कामालाही त्यामुळे बाधा येणार असल्याचे बाबर यांनी आपल्या पत्रात म्हटले . रेल कॅर्पोरेशन बरोबरच राजाराम बाबर यांनी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा,वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित आणि पालिका आयुक्त संजय हेरवाडे याना हि याबाबचे पत्र दिले आहे.

Vasai infrastructure issue
Orange prices rise : आवक घटल्याने संत्र्यांच्या दरात वाढ

पूर्वेला असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास 70 ते 75 हजार कामगार काम करत आहेत . त्यातील बरेच कामगार हे उत्तर वसईतील असून ते मोटर सायकल किंवा चारचाकी वाहनाने येत असतात . त्यांना आता वळसा घालून पूर्वेला यावे लागेल. त्याच प्रमाणे याठिकाणी रहिवासी वसाहत हि मोठी असून त्यातील नागरिकांना पश्चिमेला जातानाही वळसा घालून जावे लागणार आहे.

फ्रान्सिस फर्नांडिस, उपाध्यक्ष, वसई इंडस्टीयल असो.

वसई पूर्वेला येणार रस्ता बंद केल्यावर पूर्वेकडील नागरिकांना लांब जाऊन पुन्हा पुरवला यावे लागणार आहे. भविष्यात त्याठिकाणची लोकसंख्या वाढणार आहे. एक तर पूर्वेकडील कारखाने वेगवेगळ्या कारणांनी स्थलांतरित होत असताना आता पूर्वेला येणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील गाडयांना वळसा घालून यावे लागले तर त्याचा परिणाम होणार असल्याने रेल कॅर्पोरेशन आणि महानगरपालिकेने यात लक्ष घालून पूर्वेकडे येणार रस्ता ठेवावा.

राजाराम बाबर, शिवसेना जिल्हा सचिव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news