

Two students at Ashram School committed end of life by hanging
वाडा : वाडा तालुक्यातील एका गावात अनुदानित आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. आश्रमशाळेच्या जवळ पहाटेच्या सुमारास झाडाला दोघे जण लटकल्याचे आढळले. यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. आश्रमशाळेतील सुरक्षारक्षकाच्या हा प्रकार लक्षात आला. मात्र तोपर्यंत खूप वेळ झाल्याचे त्यांनी सांगितले. वाडा पोलिसांनी याबाबत गुन्ह्याची नोंद केली आहे.
नववी आणि दहावी इयत्तेत हे विद्यार्थी शिकत होते. मोखाडा तालुक्यातील दापटी गावातील ते दोघेही रहिवासी आहेत. पहिलीपासून हे दोन्ही विद्यार्थी याच आश्रमशाळेत शिकत असून त्यांनी अचानक उचललेल्या या टोकाच्या पावलाने पालकांना धक्का बसला आहे.
या माध्यमिक आश्रमशाळेत एकूण ५२० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे मोबाईल फोन असून तीन ते चार दिवसांपासून आम्ही जीनव संपवणार असल्याचे मुलांना सांगत असल्याची माहिती मिळाली आहे. मृत्यूपूर्वीची कोणती चिठ्ठी मिळाली नसून मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. त्यांच्याकडे मोबाईल कसा आला, हे आम्हालाही ठाऊक नाही, असे अधिक्षक राजू सावकारे यांनी सांगितले.