Versova Bridge Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा पुलावरून टँकर खाडीत कोसळला, एक जण ठार

लाकडांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला टँकर जोराचा धडकला
Versova Bridge Accident
वर्सोवा पुलावरून टँकर खाडीत कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Mumbai Ahmedabad Highway Accident

खानिवडे: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदरच्या वर्सोवा पुलावरून ऑइल वाहतूक करणारा अवजड टँकर कठडा तोडून खाडीत कोसळला. ही दुर्दैवी घटना आज (दि.२३) सकाळी ११ .३० च्या सुमारास घडली. दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून विरारवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ऑइल वाहून नेणारा ऑइल भरलेला टँकर जुन्या पुलावरून जात असताना त्याच रस्त्यावरून लाकडांची वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या वाहनाला जोरदार धडकला. यामुळे टँकर अनियंत्रित होऊन पुलाचा कठडा तोडून पुलावरून थेट खाडीत कोसळला. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

Versova Bridge Accident
Palghar News : पालघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेचा खोळंबा

या घटनेची माहिती काशिगाव पोलीस व वाहतूक विभाग यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाला ही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी शोधकार्य सुरू केले होते. दरम्यान, या अपघातानंतर एक जण खाडीत पुलाच्या पिलर जवळ तरंगत होता. त्याला बाहेर काढण्यासाठी इतर वाहन चालकांनी गाडीत असलेली जाड दोरी सोडली होती. मात्र, तो कुठलीही हालचाल करत नव्हता. त्याचा जागीच बुडून मृत्यू झाला होता . तो चालक होता की आणखी कोण हे कळू शकले नाही. मात्र आतापर्यंत त्या तरंगणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला आहे.

अजून अन्य कोणी व्यक्ती खाडीत कोसळलेल्या टँकर मध्ये अडकला आहे का ?याचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोसळलेला टँकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Versova Bridge Accident
Palghar News : पालघर जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news