Palghar coastal erosion : शिरगाव समुद्रकिनारी सुरूची झाडे उन्मळून पडली

तीव्र कोपाचा बसला फटका, उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
Palghar coastal erosion
Palghar coastal erosionpudhari photo
Published on
Updated on

पालघर शहर : पालघर जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार आणि समुद्रकिनाऱ्याची धूप यामुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या सुरुच्या झाडांना देखील बसला असून समुद्र किनाऱ्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. शिरगाव समुद्रकिनारी असलेली सुरुची २५ हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शिरगांवच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याला निसर्गाच्या तीव्र कोपाचा फटका बसला आहे. शिरगाव किनाऱ्यावर दक्षिणेकडील सुंदर सरूची बाग अक्षरशः उध्वस्त झाली झाल्याचे दिसून येत आहे.

Palghar coastal erosion
Sambhajinagar Rain : शहरात मुसळधार : ३९ मिमीपेक्षा अधिक पाऊस

मुसळधार पाऊस, वादळी वारा त्याचप्रमाणे समुद्राच्या उधाणामुळे किनाऱ्याची प्रचंड धूप झाली असून, त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचा आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जवळपास २५ ते ३० भली मोठी सरूची झाडे मुळासकट उन्मळून किनाऱ्यावर पडली आहेत. समुद्रातील येणार्या उधाणाच्या मोठ- मोठ्या लाटांमुळे समुद्रकिनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याचे दिसून येत आहे.

Palghar coastal erosion
Palghar Heavy Rain: मुसळधार पावसाचा डहाणू तालुक्याला जबर फटका

समुद्रकिनाऱ्यांची धूप

पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ मोठ्या लाटांमुळे समुद्रकिनाऱ्यांची माेठ्या प्रमाणात धुप होते. त्यामुळे किनाऱ्यावरील आणखी झाडे उन्मळून कोसळण्याची शक्यता आहे. शासनाने समुद्रकिनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news