

वाणगाव ः नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्सऑफ द ट्रीज आयोजित भाजीपाला फुले फळेच्या 63व्या प्रदर्शनात पुन:एकदा ,डहाणू तालुक्यातील बावडे(वाणगांव) येथील देशविदेशात सर्वदुर प्रसिद्ध गुलाब अवलिया बबन चुरी यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
डहाणू तालुक्यातील बावडा या मुळगांवी सुमारे 2 हेक्टरांत त्यांची गुलाबशेती असून दिवसाला विविध रंगाची सुमारे 2.5 हजार आणि गावठी गुलाबांची 10 हजार फुले ते शेतीतून काढतात.1977 मध्ये आगाशी ता.वसई येथील मेव्हणे देवराव पाटील यांनी 175 गुलाबाची रोपे भेट देत फुलशेतीसाठी प्रोत्साहित केले.1978 साली इंग्लिश गुलाबांची 10 रोपे भेट दिली,तर 210 रोपे पुणे येथून आणली.
मेव्हण्यांनीच त्यांना कलम बांधणीचे तंत्र देखील शिकविले आणि विविध गुलाब प्रदर्शनातील सहभागासाठी प्रेरणात्मक ऊर्जा दिली. भार्या शैला यांनी अनेक वर्षे फुलविक्री करून सहकार्य केले. पाचु रोझेस या आपल्या नर्सरीतून ते गुलाब कलमे विक्रीसुद्धा करतात.2002 पर्यंत त्यांच्याकडे 360 गुलाबांच्या जाती होत्या,मात्र महापुरात त्यापैकी काही नष्ट होऊनआजही 125 जाती त्यांच्याकडे आहेत.
चुरी यांना अनेक वर्षे गुलाब शेतीचा अनुभव असल्याने काही मिनिटांत ते आजही कलम बांधतात. मुलगा विशाल वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत शेतीतील प्रयोगशीलतेसाठी ओळखला जातो. शेतीविभागाने त्याला शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविले आहे. याच ठिकाणी उत्तम सादरीकरण आणि इतर14 बक्षिसांवर आपले नांव उमटवत ते स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत. त्यांना एकूण चार ट्रॉफी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट चेतन देसाई,माजी गव्हर्नर हरजितसिंग तलवार,अशोक कोठारी,अरुण सावंत चेअरमन चंद्रकांत साळुंखे यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित केले गेले आहे.
...ल्याली माळ सुगंधित गुलाबाची
1980मध्ये त्यांना प्रथमत: गुलाबाचा राजा आणि गुलाबाची राणी हा पुरस्कार मिळालाअन् त्यानंतर पुढे सलग 1998पर्यंत गुलाब पुरस्कारावर त्यांचे नांव कोरले गेले.राष्ट्रीयस्तरावर चार वेळा हे दोन्ही पुरस्कार पटकावले.1999ला जयपूर येथील आशियायी किंग ऑफ द रोज शोप्रदर्शनात गुलाबाचा राजा (ग्ल्याडीएटर जात) हा पुरस्कार मिळवला.25वर्षानंतर यंदा पुन:त्यांनी गुलाबाचा राजा व गुलाबाची राणी पुरस्कार पटकावत दैदिप्यमान यश मिळवल्याने पुन:एकदा या सुगंधित धुरंधरअवलियाचा गुलाबसुगंध पूर्ण देशभराच्या बॉर्डरपर्यंत दरवळू लागला आहे.
सुमारे अर्धशतक वर्षे गुलाब शेतीतीलअभ्यास वअविरत मेहनतीने यश माझ्या पायाशी येऊन लोळण घेऊ लागलेअन हे सर्व मेव्हणे देवराव पाटील,पत्नी शैला,मुलगा विशाल व सून तृप्ती यांच्या अविश्रांत पारिश्रमिक सहकार्यामुळेच शक्य झाले.
बबन चुरी गुलाब अवलिया, बावडे(डहाणू)जि.पालघर.