Palghar Crime : बोईसरमध्ये अंतर्गत वादातून गोळीबार; एक जण गंभीर

आरोपी फरार; पोलिसांची पथके रवाना
Boisar firing incident
बोईसरमध्ये अंतर्गत वादातून गोळीबार; एक जण गंभीर pudhari photo
Published on
Updated on

बोईसर ः बोईसरजवळील महागाव परिसरात अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात सुरेश वरखंडे (52) हे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. गोळीबार करणारा उमेश घरत (रा. बेटेगाव) फरार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बेटेगाव येथील चिकन भुजिंग सेंटरचा मालक उमेश घरत आणि जखमी सुरेश वरखंडे यांच्यातील वैयक्तीक वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे. दोघांमधील असलेल्या वादाच्या रागातून घरत याने सोमवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान महागाव येथील वरखंडे यांच्या घरात घुसून पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Boisar firing incident
Wild animals damage crops : जंगली प्राण्यांचा भात व कडधान्यांच्या शेतात धुडगूस

या घटनेत सुरेश वरखंडे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला बेटेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

Boisar firing incident
Solar Power Project : कुकडी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक सुनील जाधव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने पंचनामा करून पिस्तूल व अन्य पुरावे जप्त केले आहेत. तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news