Panvel Vasai rail corridor : उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर परवानगीच्या अंतिम टप्प्यात

केंद्र व रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीकडे लक्ष
Panvel Vasai rail corridor
Panvel Vasai rail corridorpudhari photo
Published on
Updated on

मनवेलपाडा : पनवेल–वसई परिसरातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या पनवेल–वसई उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या प्रस्तावाला आता अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असून, केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मान्यतेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पनवेल, नवी मुंबई, वसई-विरार आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या आणि रस्ते वाहतुकीवरील ताण लक्षात घेता पनवेल–वसई रेल्वे जोडणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या या परिसरातील नागरिकांना विविध मार्गांनी प्रवास करताना मोठा वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळे थेट आणि सक्षम रेल्वे जोडणी झाल्यास प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

Panvel Vasai rail corridor
Nalasopara school cooker blast : सोपारा जिल्हा परिषद शाळेत कुकरचा स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ऑक्टोबर २०२५ पासून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला कधी हिरवा कंदील मिळतो, याकडे पनवेल-वसई पट्ट्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. पनवेल आणि वसई या दोन महत्त्वाच्या उपनगरांना रेल्वे मार्गाने जोडण्याचा हा प्रकल्प केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

या मार्गामुळे सध्याच्या रेल्वे मार्गांवरील प्रवाशांचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर कारणांसाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वसई-विरार आणि पनवेल परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. नव्या गृहसंकुलांची वाढ, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार तसेच वाढती लोकसंख्या यामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. परिणामी अनेक वेळा वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

अशा परिस्थितीत सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. पनवेल–वसई उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रत्यक्षात आल्यास रस्ते वाहतुकीवरील काही प्रमाणातील भार रेल्वेकडे वळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांसोबतच वाहनचालकांनाही अप्रत्यक्ष दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Panvel Vasai rail corridor
Electricity Theft Panvel : अनधिकृत इमारतींमध्ये वीजचोरीचा पर्दाफाश

राज्य पातळीवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव केंद्राच्या पातळीवर अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने आता रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानंतर पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या

पनवेल ते वसई दरम्यान थेट उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाल्यास या संपूर्ण पट्ट्यातील प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे. सध्या विविध मार्गांवरून प्रवास करताना लागणारा वेळ, बदलावी लागणारी वाहने आणि वाढता खर्च यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या मंजुरीकडे नागरिक आशेने पाहत आहेत.

दळणवळण व्यवस्थेला चालना मिळणार

पनवेल–वसई रेल्वे कॉरिडॉरला अंतिम मंजुरी मिळाल्यास भविष्यात या भागातील दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ रेल्वे मार्ग नसून वसई-विरार ते पनवेल या विस्तारणाऱ्या शहरी पट्ट्याला जोडणारी महत्त्वाची वाहतूक कडी ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news