Palghar Hospital Case: रिलीफ हॉस्पिटल प्रकरणाने पालघर शिवसेनेची कोंडी; कुंदन संखेंसह प्रमुख नेते आरोपींच्या रडारवर

रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी कारवाई; नगरपरिषद निवडणुकीतील यशानंतर पक्षासमोरील अडचणी वाढल्याची चर्चा
Palghar Hospital Case
Palghar Hospital CasePudhari
Published on
Updated on

हनिफ शेख

पालघर: नगरपालिका निवडणुकीत चांगले यश संपादन केलेल्या शिवसेनेला हॉस्पिटल कर्मचाऱ्याला केलेली मारहाण प्रकरण मात्र चागलेंच महाग पडले आहे. जिल्हा प्रमुखांसह प्रमुख नेते आरोपींच्या फैरीत अडकल्याने शिवसेनेची दहीहंडी कुणी फोडली असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे हा पक्षच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे.

शिवसैनिकाकडून रिलीफ हॉस्पिटल कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणप्रकरणी आता सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने पालघर,डहाणू विधानसभेचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित आणि शहराध्यक्ष राहुल घरत यांच्याभोवती हे प्रकरण अधिक फिरत असल्याचे समाज माध्यमातून प्रसार माध्यमातून दिसून येत आहे.

Palghar Hospital Case
Murbad Voter List: मुरबाडमध्ये मतदार यादीत मोठी घट; १ लाख ३४ हजारांहून अधिक नावे वगळली

मुळात आजवर शिवसैनिकांना सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढताना ही राडा संस्कृती नवीन नाही. आजवर संपूर्ण राज्यभर किंवा प्रामुख्याने पालघर जिल्ह्याचा जरी अभ्यास केला तर या आधी देखील अशी आंदोलने मोर्चे किंवा कार्यालयात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारणे अशी प्रकरणी झालीच आहेत.

मात्र नुकत्याच घडलेल्या रिलीफ हॉस्पिटल मधील एका कर्मचाऱ्याला मारलेली चापट आणि त्यानंतर झालेली बाचाबाची हे प्रकरण एवढं पुढे जाईल याची पुसटशी कल्पना देखील शिवसैनकांना नव्हती. मात्र पालघर जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेने हायकोर्टात घेतलेली धाव डोंबिवली येथील ताजे असलेले म्हात्रे प्रकरण आणि एकूणच प्रसार माध्यमांनी देखील हे प्रकरण चांगलेच उचलून धरले.

यामुळे हे प्रकरण या शिवसेनिकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. आणि नेहमीप्रमाणे पक्षाकडून मिळणारी रिलीफ या रिलीफ हॉस्पिटल प्रकरणात न मिळाल्याने आणि लागलीच नवीन जिल्हाप्रमुख कोण होईल यासाठीच्या सुरू असलेल्या हालचाली यावरून यामागे बरच राजकारण शिजत असल्याचं दिसून येत आहे.

यामुळे प्रत्यक्षात पालघर शिवसेनेकडून बांधलेली दहीहंडी कोणी फोडली यापेक्षा कुंदन संख्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेली शिवसेनेची दहीहंडी कोण फोडू पाहत आहे अशी चर्चा देखील आता जिल्ह्यात रंगली आहे. पालघर जिल्ह्यात दोन विधानसभा निहाय जिल्हाप्रमुख देण्यात आलेले आहेत.

Palghar Hospital Case
Ganpati Visarjan Noise Pollution: गौरी गणपती विसर्जनामध्ये ढोल-ताशा, बँजोचा दणदणाट; आवाजाची पातळी १०५ डेसिबलपर्यंत

यामधील नालासोपारा वसई विधानसभेसाठी वेगळा तर विक्रमगड आणि बोईसर विधानसभेसाठी वसंत चव्हाण आणि पालघर आणि डहाणू विधानसभेसाठी कुंदन संख्ये हे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत कुंदन संख्यें भोवती राजकारण फिरत होते. यामध्ये पालघर आणि डहाणू नगरपरिषदांमध्ये शिवसेनेला चांगले यश देखील मिळाले.

यानंतर संख्येचा वारू सुसाट झाला होता. अशा सर्व स्तरावर कुंदन संख्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बऱ्यापैकी गाजावाजा पालघर जिल्ह्यात चालला होता. ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी कार्यक्रमात गोविंद पथकातील काही तरुणांना मार लागला त्यामुळे रिलीफ हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले.

मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना सोडण्यात न आल्याने जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासोबत दहीहंडी पथकातील काही तरुण आणि पदाधिकारी त्या ठिकाणी पोचले त्यानंतर काय घडले हे सीसीटीव्हीतून समोर आले आहेच मात्र शहराध्यक्ष राहुल घरत यांनी तेथील कर्मचारी विवेक झिंगा यांच्या एक कानाखाली लावल्याचे दिसून आले यानंतर हॉस्पिटलने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांनी हॉस्पिटलमध्ये काय राडा झाला याबाबत सविस्तर फिर्याद केली.

नेहमीप्रमाणे हे प्रकरण जागेवर मिटेल असा अनेक प्रकरणातून आलेला आत्मविश्वास या शिवसेनेकांमध्ये होता मात्र त्या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसिद्ध झाला.

यावर तात्काळ शिवसेना पक्षाकडून शहराध्यक्ष राहुल घरत यांचे निलंबन केले आणि पोलीस स्टेशनला हजर देखील झाले एवढ्यावर ही कारवाई थांबेल असे वाटत असतानाच डॉक्टर संघटनांनी हायकोर्टात धाव घेतली या प्रकरणी विभागीय अतिरिक्त पोलीस महानिरीक्षकांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले यातून पालघर पोलीस खडबडून जागे झाले आणि हे प्रकरण आपल्याच अंगलट येईल की काय म्हणून सर्वच आरोपींना अटक करण्यासंबंधीची कार्यवाही वेगाने सुरू झाली.

आमदार राजेंद्र गावित यांची मंत्री उदयसामंताकडून पाठराखण.

या प्रकरणात पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावीत यांचे नाव आल्याने विरोधकाकडून आमदार गावित यांच्यावर टिका व्हायला लागली. मात्र पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राजेंद्र गावित यांनी सांगून हे प्रकरण झाले आहे का? असा उलट सवाल करीत यामध्ये गावित यांचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आणि आजवर आमदार गावित यांची पार्श्वभूमी पाहता मूळचे काँग्रेसची असलेले गावित नंतर भाजप नंतर शिवसेना असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

मात्र राडा संस्कृती किंवा अशी मारहाण प्रकरणात त्यांचा याआधी देखील कधीही कुठेही सहभाग आढळून आला नसल्याचे चित्र आहे. मात्र या प्रकरणात त्यांचे पुत्र रोहित गावित यांचे नाव आल्याने त्यांच्यावर देखील विरोधकांना त्यांना अडचणीत आणण्याची आयती संधी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news