Palghar news | १० लाखांचा रस्ता अवघ्या 5 महिन्यांत तडकला

'धामटणे कातकरी पाडा'त निकृष्ट कामाचा संताप
Palghar news | १० लाखांचा रस्ता अवघ्या 5 महिन्यांत तडकला
Published on
Updated on

कासा : ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत १० लाख रुपये खर्चून उभारलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता अवघ्या पाच ते सहा महिन्यांतच खचल्याने या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तवा ग्रामपंचायत हद्दीतील धामटणे कातकरी पाडा येथे घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

काय आहे प्रकरण?

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून धामटणे कातकरी पाड्यातील नागरिकांच्या दळणवळणाची गैरसोय दूर करण्यासाठी हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधण्यात आला होता. यासाठी १० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, कामाचा फलकही उभारण्यात आला आहे. मात्र, काम पूर्ण झाल्याच्या काही महिन्यांतच हा रस्ता ठिकठिकाणी तडकू लागला आहे.

Palghar news | १० लाखांचा रस्ता अवघ्या 5 महिन्यांत तडकला
Palghar News | धामटणे कातकरी पाड्यातील सिमेंट रस्त्याला पाच महिन्यांतच तडे

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

सध्या या रस्त्याची पाहणी केली असता, रस्त्याच्या मध्यभागी आणि कडेला मोठमोठ्या भेगा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अनेक ठिकाणी काँक्रीटचा थरही उखडण्यास सुरुवात झाली आहे. इतक्या कमी कालावधीत रस्ता खराब होणे हे स्पष्टपणे निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर आणि कामातील हलगर्जीपणा दर्शवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Palghar news | १० लाखांचा रस्ता अवघ्या 5 महिन्यांत तडकला
Kolhapur News | शिरढोण ग्रामपंचायतीतील ८० लाखांच्या गैरव्यवहाराप्रकरणी कारवाईची मागणी

लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे कारवाईची मागणी

ग्रामीण व आदिवासी विकासासाठी मिळणारा सरकारी निधी कशा प्रकारे वाया घालवला जातो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय करणाऱ्या ठेकेदारांवर आणि या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून रस्ता पुन्हा दर्जेदार पद्धतीने बांधून मिळावा, अशी आग्रही मागणी धामटणे कातकरी पाड्यावासीयांनी केली आहे. संबंधित बांधकाम विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अहवाल सादर करावा, अशी मागणी आता जोरकसपणे होत आहे.

Palghar news | १० लाखांचा रस्ता अवघ्या 5 महिन्यांत तडकला
Jalgaon News | गाव तहानलेलं ठेवून पळवलं २० लाख लिटर 'सरकारी पाणी'! जामनेरमधील पाणी चोरीच्या 'महाघोटाळ्या'ने खळबळ!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news