Kolhapur News | शिरढोण ग्रामपंचायतीतील ८० लाखांच्या गैरव्यवहाराप्रकरणी कारवाईची मागणी

आठ दिवसांत निर्णय न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा
Shirol Shirdhon Gram Panchayat Financial Fraud
Shirol Shirdhon Gram Panchayat Financial FraudPudhari
Published on
Updated on

Shirol Shirdhon Gram Panchayat Financial Fraud

शिरढोण : शिरोळ तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ८० लाख रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप संबंधित पदाधिकारी आणि ग्रामसेवकांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिरढोण बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मीन यांना दिला आहे. ही माहिती समितीचे प्रमुख सातगोंडा पुजारी आणि अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातगोंडा पुजारी यांनी सांगितले की, सन २०२१ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत शिरढोण ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे यांनी केली असून, त्यांनी ४ मे रोजी जिल्हा परिषदेकडे सविस्तर अहवाल सादर केला आहे.

Shirol Shirdhon Gram Panchayat Financial Fraud
Kolhapur Rain News| कोल्हापुरात आठवडाभर पावसाची शक्यता

या चौकशी अहवालात गेल्या चार वर्षांत कार्यरत असलेल्या पाच सरपंच आणि दोन ग्रामसेवकांना दोषी ठरविण्यात आले आहे. तपासादरम्यान विविध विभागांमध्ये नियमबाह्य खर्च करण्यात आल्याचे तसेच काही विकासकामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री दाखवून निधीचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारातून तब्बल ८० लाखांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.

मात्र, अहवाल सादर होऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मीन यांची भेट घेत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

Shirol Shirdhon Gram Panchayat Financial Fraud
Kolhapur News : पातळी घटली; चिंता वाढली

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मीन यांनी या प्रकरणी अधिक स्पष्ट आणि सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले असून, अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

यावेळी सुरेश सासणे, विश्वास बालीघाटे आणि अशोक मगदूम उपस्थित होते.

अहवालात पाच सरपंच, दोन ग्रामसेवक दोषी

शिरढोण ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालात चार वर्षांच्या कालावधीत कार्यरत असलेल्या पाच सरपंच आणि दोन ग्रामसेवकांना दोषी ठरविण्यात आले आहे. विविध विकासकामांमध्ये नियमबाह्य खर्च, बनावट नोंदी आणि कागदोपत्री कामे दाखवून ८० लाखांहून अधिक निधीचा अपहार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news