

खानिवडे : मुंबई -अहमदाबाद महामार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबई वरुन अहमदाबाद दिशेने हा अवजड वाहतुकीचा कंटेनर भरधाव वेगाने जात असताना चिंचोटी चढावावर चालकांचा ताबा सुटला. तो दुभाजकाला भिडला. यामुळे असंतुलित होऊन दुभाजकावर पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली.
या अपघाताची खबर मिळताच वाहतूक शाखा पोलीस चिंचोटी घटनास्थळी पोहोचून टेलरला दोन्ही क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.याच बरोबर काशीमिरा येथे एका महेंद्रा पीक वाहनाने अचानक ब्रेक घेतल्याने त्या पाठोपाठ चालणाऱ्या बुलेट दुचाकीच्या चालकाला वेग आवरता न आल्याने दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने तो जखमी झाला. तर याचवेळी पाठीमागून येणारा एक अवजड ट्रक बुलेटला वाचवण्यासाठी डावीकडे वळल्याने त्याच्या पाठीमागून येणारा ट्रक त्याला भिडला. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.