

गेवराई : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाग पिंपळगाव बायपास रस्त्यावर कंटेनर आणि ट्रकचा मंगळवारी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला. दुसऱ्या ट्रकचा चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छ. संभाजी नगर येथे हलविण्यात आले आहे.
बीडकडुन छ. संभाजी नगर कडे येणारा रिकामा कंटेनर क्रं (टीएस 07 युएम 7334) व छ संभाजी नगर येथून बीडकडे जात असलेला ट्रक क्रं. युपी 21 सीएन 3199 या दोन वाहनांचा सदरील बाग पिंपळगाव बायपास येथे उड्डाणपूलाचे काम सुरू असून जवळपास दोनशे मिटरवर एकेरी वाहतूक करण्यात आली असून वाहन चालकांचे आपल्या वाहनावरील संतुलन बिघडल्याने दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने या झालेल्या भिषण अपघातात टीएस 07 युएम 7334 चा लातुर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील वडवण येथील चालक इमाम पठाण वय 40 वर्षे हे जागीच ठार झाले.
त्यांचा मृतदेह क्रेनच्या साहाय्याने तब्बल एक ते दिड तासाने बाहेर काढण्यात आला तर दुसऱ्या वाहनातील चालक जावेद गुलाम चौधरी व फर्मान जावेद पाशा मृदाबाद युपी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराईतील उपजिल्हा रुग्णालय उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान सदर ठिकाणी वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने गेवराई शहरातून वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. तर तब्बल तीन तासानंतर ट्राफिक पोलिसांनी गेवराई पोलीस यांच्या वतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सदरील घटनेचा पंचनामा पोलीस हवालदार सुंदर राठोड यांनी केला आहे घटनेचा अधिक तपास गेवराई पोलीस करत आहे.