Palghar Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुधाचा टँकर पलटी; दूध घेण्यासाठी नागरिक, वाहनचालकांची झुंबड

तवा येथे हजारो लिटर दूध रस्त्यावर सांडले
Mumbai Ahmedabad Highway Amul Milk Tanker Overturns
Mumbai Ahmedabad Highway Amul Milk Tanker OverturnsPudhari
Published on
Updated on

Mumbai Ahmedabad Highway Amul Milk Tanker Overturns

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे सोमवारी (दि. २१) दुपारी तीनच्या सुमारास अमूल कंपनीचा दुधाचा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. गुजरातहून विरारच्या दिशेने जाणारा GJ 19 X 8250 क्रमांकाचा दुधाचा टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकला. त्यानंतर टँकर मुंबई वाहिनीवरून थेट गुजरातच्या दिशेच्या वाहिनीवर जाऊन पलटी झाला.

या अपघातात टँकरमधील मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडल्याने महामार्गावर अक्षरशः दुधाचे लोट वाहत होते. टँकर पलटी झाल्यानंतर त्यामधून मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडले. दूध मोठ्या अंतरापर्यंत पसरल्याने मोठ्या प्रमाणात लिटर दूध वाया गेल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तसेच महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी घटनास्थळी गर्दी केली.

Mumbai Ahmedabad Highway Amul Milk Tanker Overturns
Palghar News | सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हिट’चा फील..! तापमान पोहचले ३३ अंशावर

काहींनी बाटल्या, प्लास्टिकचे ड्रम तसेच मिळेल त्या भांड्यांचा वापर करून टँकर मधील निघत असलेले दूध घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ घटनास्थळी नागरिक आणि वाहनचालकांची दूध घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.

दरम्यान, अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती काही प्रथमदर्शींनी दिली. मात्र, चालक नेमका कोणत्या परिस्थितीत घटनास्थळावरून निघून गेला, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका, पेट्रोलिंग वाहन तसेच कासा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली.मात्र या घटनेमुळे गुजरात वाहिनीवर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

Mumbai Ahmedabad Highway Amul Milk Tanker Overturns
Palghar news: हॉस्पिटलमध्ये मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दणका, शिंदेसेनेतून निलंबन

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पडलेले खड्डे तसेच दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही या महामार्गावर अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चारोटी उड्डाणपुलावर रसायनयुक्त टँकर पलटी होऊन चालक जखमी झाला होता.

महामार्गावरील अपघातांच्या घटनांनंतर रस्त्याची स्थिती, खड्डे, वळणांवरील सुरक्षाव्यवस्था तसेच दिशादर्शक फलकांचा अभाव हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर येत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news