Palghar news: हॉस्पिटलमध्ये मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दणका, शिंदेसेनेतून निलंबन

एकनाथ शिंदे यांनी पालघर येथील रिलीफ हॉस्पिटल मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी केली आहे
Palghar news
Palghar newsFile Photo
Published on
Updated on

Palghar news

पालघर : बाबासाहेब गुंजाळ

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर येथील रिलीफ हॉस्पिटल मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी केली आहे.

त्यांच्यासोबत युवा सेना जिल्हाप्रमुख साईराज पाटील, पालघर आमदार पुत्र रोहित गावित, मनीष संखे, राहुल संखे, ऋषभ वारे या सगळ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र नगरसेवक निलम संखे यांची पक्षातून हकालपट्टी केली नाही. त्यांची हकालपट्टी का केली नाही, हा सवाल अजूनही बाकी आहे.

Palghar news
Palghar Shivsena | शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत निलंबित!

रविवारी रात्री झालेल्या राड्यानंतर शिवसेना पक्षाच्या १७ लोकांवरती गुन्हा दाखल झाला होता. त्यात शहर प्रमुख राहुल घरत यांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर संशयित आरोपींची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणानंतर शिवसेना पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्र काढून या सगळ्यांची हकालपट्टी केल्याच्या जाहीर केले आहे.

दैनिक पुढारीच्या बातम्यांची गंभीर दखल

'दैनिक पुढारी'ने याबाबत अन्यायला वाचा फोडणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मंगळवारी पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेत आमदार पुत्र रोहित गावित व कुंदन संखे यांच्यासह इतर आरोपींवरती कारवाई कधी? असा परखड सवाल केला होता. त्यानंतर दुपार होण्याच्या आत शिवसेना पक्षाकडून हकालपट्टीची घोषणा करण्यात आली. दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांची तसेच प्रकरणाची गंभीर दखल शिंदे यांनी घेतली आहे.

Palghar news
Palghar Hospital: पालघरमध्ये जखमी गोविंदाच्या उपचारावरून शिवसैनिकांचा गोंधळ; रुग्णालयीन कर्मचाऱ्याला मारहाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news