Palghar Accident | मोखाड्यात दुचाकी अपघात; दोन तरुणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी; वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून मृतदेह पाठवल्याने संताप

मोखाडा तालुक्यातील गोमघर गावाजवळ अपघात
Mokhada Two Wheeler Accident
Mokhada Two Wheeler AccidentAI Image
Published on
Updated on

Mokhada Two Wheeler Accident

पालघर : मोखाडा तालुक्यातील गोमघर गावाजवळ गुरूवारी (दि.२१) सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असताना अपघातानंतर वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जखमी तरुण गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते. मात्र खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची अथवा १०८ रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध न झाल्याने उपचारासाठी तब्बल दोन तासांचा विलंब झाला. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर मृत तरुणांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

Mokhada Two Wheeler Accident
Palghar Dhanivari Accident | “हा अपघात नाही, व्यवस्थेने केलेला खून”: सुरक्षित क्रॉसिंगच्या अभावामुळे १३ जणांचा बळी

दरम्यान, त्या मार्गावरून जाणारे निखिल गारे यांनी स्वतःच्या वाहनातून आणि पोलिसांच्या मदतीने दोन जखमींना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला.

या अपघातात अनिल यशवंत सवरा (वय २८, बोट्याचा पाडा) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर लक्ष्मण गांगड (वय २८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलीप गांगड आणि देवीदास गांगड हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mokhada Two Wheeler Accident
Palghar Accident | धानिवरी दुर्घटनेतील १२ मृतांवर बापुगाव येथे सामूहिक अंत्यसंस्कार

अपघातानंतर मृतदेह वाहून नेण्यासाठीही रुग्णवाहिका किंवा अन्य शासकीय वाहन वेळेत उपलब्ध झाले नाही. तब्बल चार ते पाच तास मृतदेह रस्त्यावर पडून राहिल्यानंतर ग्रामस्थांनी एका वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून मृतदेह पाठवला. या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, खोडाळा-वाडा मार्गावरील गोमघर गावाजवळ, खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला.

Mokhada Two Wheeler Accident
Palghar Fatal Accident : मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत : पालकमंत्री गणेश नाईक

पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर यापूर्वीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नुकत्याच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातातही वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याची घटना ताजी असताना मोखाड्यातील या घटनेने पुन्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

वेळेत उपचार मिळाले असते तर जखमींचे प्राण वाचू शकले असते, अशी भावना स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. तसेच मृतदेह वाहतुकीसाठी योग्य व्यवस्था न झाल्याने मृत व्यक्तींचा अवमान झाल्याची तीव्र खंत परिसरातून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news