Palghar Accident | मोखाड्यात शाळेच्या पटांगणात भरधाव कारने १२ वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले

मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घटना
Mokhada School Girl Hit By Car
Mokhada School Girl Hit By CarPudhari
Published on
Updated on

Mokhada School Girl Hit By Car

खोडाळा : मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गुरूवारी (दि. २०) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात १२ वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या दिशेने भरधाव वेगाने गेलेल्या इको कारने सोनम युवराज खरपडे हिला जोरदार धडक दिली. या घटनेमुळे आडोशी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोनम युवराज खरपडे (वय १२) ही आडोशी येथील रहिवासी असून जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होती.

बुधवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजता सोनम शाळेत जात असताना शाळेच्या पटांगणात पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको कार (क्र. MH 14 MC 7943) उभी होती. त्याच गावातील शंकर किसन घाटाळ (वय ३६) याने वाहनचालकाकडून चावी घेऊन कार सुरू केली.

Mokhada School Girl Hit By Car
Palghar Tanker Accident | चारोटी उड्डाणपुलाजवळ रसायनाचा टँकर पलटी; सुदैवाने गळती टळली

कार सुरू करताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर कार भरधाव वेगाने शाळेच्या आवारात खेळत असलेल्या तसेच शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनींच्या दिशेने गेली. इतर मुलींनी प्रसंगावधान राखून बाजूला धाव घेतली; मात्र सोनमला बाजूला होण्याची संधी न मिळाल्याने कारने तिला समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात सोनमच्या छातीसह डोक्याला व हातापायांना गंभीर दुखापत झाली. या गंभीर दुखापतींमुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच सोनमचे वडील युवराज विलास खरपडे (वय ३२, व्यवसाय – मजुरी) यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घटनास्थळी पाहणी केली.

मोखाडा पोलीस ठाण्याचे सपोनि अजित साबळे आणि पोउपनि प्रतिक पोकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि प्रतिक पोकळे करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.

Mokhada School Girl Hit By Car
Palghar Accident | धानिवरीत पुन्हा मृत्यूचा सापळा; आयशर टेम्पोच्या धडकेत युवक ठार, दोघे गंभीर !

शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेनंतर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या सुरक्षिततेचा, विशेषतः शाळांना संरक्षण भिंत अर्थात कंपाऊंड वॉल नसल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आडोशी येथील शाळेलाही संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीकडून यापूर्वीही कंपाऊंड वॉल बांधण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी

दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मातेकर यांनी आडोशी येथे भेट देऊन शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी शाळेच्या कंपाऊंड वॉलचा प्रस्ताव VB-G RAM G – विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी (ग्रामीण) योजनेतून तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सोनमच्या कुटुंबीयांना राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news