Palghar News : पालघर शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?

एका पेट्रोल पंपावरील वितरण बंद, दुसऱ्या पंपावर नागरिकांची गर्दी
Palghar petrol diesel shortage
पालघर शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?pudhari photo
Published on
Updated on

पालघर शहर ः अमेरिका, इस्त्राईल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता देशातील स्थानिक पातळीवर देखील जाणवू लागला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यानंतर आता पालघर शहरात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले आहेत. पालघर शहरातील एका पेट्रोल पंपवर पेट्रोल संपल्याचे चित्र पहावयास मिळाले तर दुसऱ्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी वाहन घेऊन आलेल्या नागरिकांची गर्दी दिसून आली.

पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याचा सामना पालघर शहरातील नागरिकांना देखील करावा लागल्याचे पहावयास मिळाले आहे. पालघर-बोईसर मार्गावरील पालघर शहरातील औद्योगिक वसाहतीसमोर असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियमय (एच.पी) पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा मंगळवारी दुपारच्या सुमारास संपला. त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड्स लावून पेट्रोल डिझेल वितरणाची सेवा बंद करण्यात आली.

Palghar petrol diesel shortage
Palghar Gram Panchayat strike : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

पालघर शहरातील एका पेट्रोल पंपवरील पेट्रोल डिझेल वितरण बंद झाल्याने गणेशकुंड परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर नागरिकांनी आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी सायंकाळच्या स मोठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडयाबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. पालघर जिल्हयात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही.

Palghar petrol diesel shortage
TMC employee guidelines : डीपी, स्टेट्सवर नेत्यांचे फोटो ठेवाल तर खबरदार

अफवा पसरवणे किंवा चुकीची माहिती प्रसारीत करणे हा कायद्याने दंडनिय अपराध असून अशाप्रकारचे कृत्य करणा-या व्यक्तीवर प्रशासन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी पेट्रोल डिझेलचा अनावश्यक साठा करु नये तसेच खोटया अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण पेट्रोलपंपावर गर्दी करु नये. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरु असून नागरिकांनी संयम राखावा व प्रशासनास सहकार्य करावे. पालघर जिल्हयामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी शांतता राखून खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news