

नालासोपारा: नालासोपाऱ्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्याचा धक्कादायक प्रकार आला आहे. एका महिलेला तिच्याच सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नालासोपारा पूर्व येथील एका परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर तिच्याच सासरच्या मंडळींकडून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सदर महिलेच्या म्हणण्यानुसार, सासरची सगळी मंडळी 13 वर्षांपासून मुंड्यासाठी तिला त्रास देत असून वारंवार मारहाण करत आहेत. महिला तिच्या पती आणि लहान मुलीसह त्याच इमारतीतील वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत असून, या कुटुंबीयांनी तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या मारहाणीचा संपूर्ण प्रकार इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे फुटेज आता समोर आले आहे.“या घटनेनंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.मात्र सासरच्या मंडळींनी आरोप फेटाळले असून पोलिसांनी या प्रकरणात नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.