Chicken Price Increase: शेतकऱ्यांसह शहरातील व्यावसायिकांना कुकुटपालन ठरतेय वरदान

भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये कुकुटपालन व्यवसायातून रोजगार निर्मिती; शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची जोड
Chicken Price Increase
Chicken Price IncreasePudhari
Published on
Updated on

सुमित घरत

भिवंडी: एकीकडे आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खाद्य पदार्थांसह, खाद्य तेलाचे भाव वाढले असून एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे व्यावसायिकांसह सर्वांनाच युद्धाचा फटका बसत आहे. तर दुसरीकडे बोकडाच्या मटणासह गावठी कुकुट्टांचे भाव वधारल्याने सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

त्यामुळे मांसाहार खवय्यांना मांस खरेदी करताना पॉकेटमनीचा विचार करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र अशातच चवीला गावठी प्रमाणेच ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसायाची जोड शेतकऱ्यांसह शहरातील व्यावसायिकांना वरदान ठरत आहे.

Chicken Price Increase
Job Scam: महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा; अठरा जणांची फसवणूक, महिलेविरुद्ध गुन्हा

सोनाली, कोसबाडी, कावेरी, ब्लॅक ॲस्ट्रोलग, वनराज, गिरराज, डीपी क्रॉस अशा प्रकारच्या तसेच अशाच काही प्रजातीच्या कुक्कुटपालन व्यवसायातून चांगल्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून सदर व्यवसायाला खवय्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान ब्रॉयलर चिकन कुकुटांपेक्षा गावठी स्टाईल कुकुटांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने या व्यवसायात होणारे नुकसानही कमी असल्याचे व्यावसायिक सूत्रांनी सांगितले असून योग्य नियोजन केल्यास चांगला नफा होत असल्याचे सांगितले आहे. तर गावठी स्टाईल नर, मादी पिल्ले प्रतिनग 22 ते 25 रुपये प्रमाणे बाजारात उपलब्ध असून त्यांची वाढ 3 महिन्यांत पुरेशा प्रमाणात होत असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.

तर सदर माल हा येथील अंबाडी, पडघा, भिवंडी मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून मालाची मूळ आवक ही अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर मधून येत असल्याची संभाव्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली असून कुकुटांच्या वाढीसाठी 100 ते 150 रुपये पर्यंतचा खर्च होत आहे.

सद्यस्थितीत गावठी कुकुटांचे भाव नर 800 ते 1000 रुपये आणि मादी 500 ते 600 रुपये इतके आहे. तर बोकडाच्या मटणाचे भाव 850 ते 900 रुपयांवर जाऊन पोहचले आहे. अशातच गावठी स्टाईल ब्रॉयलरचे पोल्ट्री कुक्कुटपालन व्यवसाय प्रामुख्याने ग्रामीण भागात चांगल्या प्रमाणात रोजगाराचे साधन ठरत असून शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची जोड म्हणून उदयाला येत आहे.

Chicken Price Increase
NCB Raid Titwala: टिटवाळ्यात 5 कोटींचा एमडी साठा जप्त! महिला पुरवठादार अटकेत

गावठी नर 500 ते 550 रुपये आणि मादी 300 ते 350 रुपयांपर्यंत विक्रीसाठी आहे. तर अस्सल गावठी नर, मादीचे भाव गावठी प्रमाणेच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना गावठी स्टाईल प्रजातीतील ब्रॉयलर खरेदी करणे शक्य होत असून या प्रजातीतील चवही गावठी कोंबडा नर, मादीच्या तुलनेत एकसारखीच असल्याने खवय्यांना तेवढासा फरक पडत नसून खिशालाही परवडत आहे.

त्यामुळे सर्व सामान्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यात व्यावसायिकांना यश येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना रोजगार निर्मितीचा पर्याय खुला झाला असून भविष्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जोडधंद्याचा पाया उभा राहत असल्याचे बोलले जात आहे.

सद्यस्थितीत शेती व्यवसाय परवडेनासा झाला असून भविष्यात गावठी स्टाईल कुक्कुटपालन व्यवसायाची पूरक व्यवसाय म्हणून जोड शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मितीसाठी उत्तम पर्याय आहे.

-विघ्नेश नांदुरकर, पोल्ट्री व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news