Mokhada unseasonal rain : मोखाड्यात अवकाळी पावसामुळे राजेवाडीत घराचे छप्पर कोसळले

सुदैवाने जीवितहानी टळली; जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Mokhada unseasonal rain
मोखाड्यात अवकाळी पावसामुळे राजेवाडीत घराचे छप्पर कोसळलेpudhari photo
Published on
Updated on

खोडाळा : मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत हद्दीतील जोगलवाडी महसूल गावापैकी राजेवाडी या पाड्यावर निवृत्ती निकम यांचे राहते घराचे छप्पर जोरदार पावसाच्या तडाक्याने मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कोसळून पडले. या घटनेत कुठली जीवितहानी झाली नसली तरी जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे गरीब कुटुंबावर ऐन दिवाळीच्या सणासुदीत मोठे संकट ओढवले असून कुटुंबीयांनी प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा केली आहे.

खोडाळ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जोगलवाडी पैकी राजेवाडी या गावात छप्पर कोसळलेल्या घरात निकम यांचे दोन मुले सून नातू नात व दिवाळी सणासुदीत बहिण मेव्हणे असे आठ सदस्यांचे कुटुंब रात्री झोपले असताना जोरदार बरसणाऱ्या पावसात रात्री एक वाजता त्यांच्या घरावरील एका बाजूचे छप्पर कोसळून खाली पडले जोरदार आवाज आल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी उठून बाहेर पलायन केल्याने जीवित हानी टाळली. मात्र घरातील जीवन आवश्यक वस्तूंची नुकसान झाले असून सणासुदीच्या दिवसात राहत्या घराचे छप्पर कोसळल्याने त्यांच्यावर दुःख वाढवले आहे.

Mokhada unseasonal rain
illegal hawkers issue : महामार्गाच्या गटारांवर फेरीवाल्यांचा विळखा

प्रदीप वाघ यांची आर्थिक मदत...

राजेवाडी या पाड्यावर निवृत्ती निकम या आदिवासी कुटुंबाचे राहते घर शनिवारी दि. 25 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास तुफान वादळी पावसात घराच्या वरच्या भागाचे छप्पर कोसळून पडले यात कुठली जीवितहानी झाली नसली तरी संसारोपयोगी वस्तूंसह इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मोखाडा तालुक्याचे माजी सभापती प्रदीप वाघ यांना मिळतात तात्काळ त्यांनी निकम कुटुंबियास आर्थिक मदत देऊन आधार दिला आहे. दरम्यान तात्काळ मदत मिळाल्याने निकम कुटुंबीयांनी प्रदिप वाघ यांचे आभार मानले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पाटील रघुनाथ गोतरने, दिनेश पाटील, रामदास भांगरे, नामदेव ठोंबरे, योगेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Mokhada unseasonal rain
Thane Aapla Dawakhana : आपला दवाखान्याचा ठेकेदार अखेर काळ्या यादीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news