Palghar water issues : मोखाडा तालुक्यातील धरणं, अपूर्ण कालव्यांचा प्रश्न ऐरणीवर

तालुका टॅंकरमुक्त कधी होणार...?, जलजीवनचे अनेक टप्पे आजही अपूर्ण
Palghar water issues
Palghar water issuespudhari photo
Published on: 
Updated on: 

खोडाळा : धरणं आणि कालवे यांना बहुउद्देशीय योजना म्हणतात. पंडित नेहरूंनी धरणांना "आधुनिक भारताची मंदिरे" अशी आशयगर्भ उपमा देऊन धरणं आणि कालवे यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले आहे.कारण एकाच प्रकल्पातून एकाच वेळी अनेक प्रश्न सुटतात.शेती , पिण्याचे पाणी , वीज , पूर नियंत्रण आणि दुष्काळ निवारण हे जनजीवनाशी निगडित प्रश्न सुटण्यास आणि सर्व सामान्य माणूस खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्यास त्यामुळे चालना मिळत असते.मात्र मोखाडा तालुक्यातील तीनही धरणं त्याला अपवाद ठरली आहेत.

अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर लौकिक अर्थाने पाण्याची बँक समजली जाणारी धरणं आणि या बँकेतून विकासाचा राजमार्ग गावोगावी घेऊन जाणारा कालवा आज प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे स्वतःच्याच विकासाच्या प्रतीक्षेत आहे.त्यामूळे करोडो रुपयांच्या योजना केवळ जनहिताच्या दृष्टीने केवळ मातीमोल ठरलेल्या आहेत.

Palghar water issues
Stone Quarry Royalty | पारंपरिक दगडफोडी, उत्खननात 500 ब्रासपर्यंत रॉयल्टी सवलत

डोंगराळ आणि आदिवासीबहुल असलेल्या मोखाडा तालुक्याला निसर्गाने दरवर्षी सरासरी 2700 मिमी पाऊस दिला आहे, वैतरणा, तानसा, वाघ, पिंजाळ आणि पूर्वेला वाहणारी गोदावरी या पाच प्रमुख नद्यांचा उगमही याच तालुक्यातील वतवड्याच्या डोंगररांगेत होतो. तरीही प्रत्यक्षात तालुका वर्षातील अनेक महिने टँकरवर अवलंबून आहे.पिण्याच्या पाण्याची ही समस्या मानवनिर्मित असल्याने प्रामुख्याने धरणे आहेत, पण लाभ नाही अशी वस्तुस्थिती आहे.

पळसपाडा, खोच आणि सायदे पैकी मारुतीचीवाडी ही पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी महत्त्वाची मानली जातात, मात्र त्यातील पाणी गुरुत्वाकर्षणाने गावांपर्यंत नेण्याच्या योजना पूर्णत्वास गेल्या नाहीत.त्याशिवाय अनेक ठिकाणी लघु बंधारे, चेक डॅम, बोअरवेल आणि पाईपलाईन फुटणे, टाक्यांना तडे जाणे, पंप बंद पडणे आणि योजना अपूर्ण राहणे अशा तक्रारी आहेत.

सन 2019 मध्ये मोखाड्यातील सर्व गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते.अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. भौगोलिकदृष्ट्या उतार जास्त, नद्या कोरड्या आणि भूजल पातळी कमी असल्याने मोठ्या सिंचन योजना येथे नाहीत आणि पिण्याचे पाणीही दुर्मिळ झाले आहे.त्यातच कालव्यांच्या अपूर्ण कामामुळे जलसंकट अधिक गडद झाले आहे. तालुक्याच्या जवळच मुख्य कालवा आणि उपकालव्यांचे काम अपूर्ण आणि निकृष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती होते.

एकीकडे शेतजमिनीतून कालवे नेल्याने जमिनीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. देखभाल-दुरुस्ती न झाल्याने अनेक ठिकाणी कालवे नादुरुस्त झाल्याचे चित्र आहे.त्यामूळे सिंचनासाठी पाणी नाही आणि शेतीचेही नुकसान या नुकसानीमूळे येथील शेतकरी अडचणीत आला आहे.

Palghar water issues
Fishermen satellite phones : दोन महिन्यांनंतरही मच्छीमारांची सॅटेलाइट फोनची सेवा बंदच

याबाबत मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप वाघ 15 वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.मात्र प्रशासनाच्या कानीकपाळी ओरडूनही लघू पाटबंधारे विभाग मात्र समस्या त्या गावचीच नाही.असे समजून शहामृगाप्रमाणे वाळूत डोकं खुपसून निवांत राहिलेले आहे.मात्र प्रशासनाची ही चालढकल दुर्लक्षित न करता तातडीने कार्यवाही केली नाही तर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा मनोदय वाघ यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news