Palghar Crime : मोखाड्यात मजुरांचे अपहरण करून मारहाण

५ जणांविरुद्ध गुन्हा, श्रमजीवीच्या पाठपुराव्याने प्रकार उघड
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

खोडाळा : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या वादातून आदिवासी आदिम कातकरी समाजातील दोन भावांचे गाडीतून अपहरण करून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना मोखाडा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात श्रमजीवी संघटनेने मोलाची भूमिका बजावली असून, तक्रार मिळताच मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी तातडीने कार्यवाही करत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह शेती आणि ऊसतोड कामावर उदरनिर्वाह करतात.त्यांचा भाऊ हा गेल्या ०२ वर्षांपासून म्हस्कू महारनवर, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांच्याकडे ऊसतोडीचे काम करीत होता. म्हस्कू महारनवर व त्याचे मित्र पोपट देहू मुंढे हे अधेमधे मुकादम म्हणून गावी येत असत. फिर्यादीनुसार, ओळखीचे कामगार पुरवण्यासाठी म्हणून म्हस्कू महारनवर यांना बयाना म्हणून २,८५,०००/- रुपये रोख देण्यात आले होते.

Crime News
Latur News : चार तासांत पोलिसांनी लावला 'त्या' अमानुष मारहाणीचा छडा !

त्यानंतर कामावर न येण्यावरून वाद झाला. आम्ही तुमचे पैसे परत देऊ, असे सांगूनही आरोपींनी त्यांनी धमकावणे सुरू ठेवले. काही दिवसांपुर्वी फिर्यादी शेंड्याची मेट येथील बसस्टॉपवर नाशिक येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना एका गाडीतून ०२ अनोळखी इसम खाली उतरले व त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. गाडीत चालकाच्या बाजूच्या सिटवर म्हस्कू महारनवर हा चालक होता तर इतर आरोपी होते.

त्यानंतर त्याच दिवशी साईखेडा, ता. निफाड, जि. नाशिक येथील बसस्टॉपवरून त्यांच्या भावाला नवनाथ महादू भोये यालाही जबरदस्तीने त्याच गाडीत घालून, लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करीत तसेच जातीवाचक अपमान करीत तरडगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे म्हस्कूच्या घरी डांबून ठेवले. "पैशांची मागणी व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. "मारहाण केल्याचे कोणाला सांगितल्यास पुन्हा मारहाण करू" अशी धमकी देऊन दोघांनाही सोडून देण्यात आले. ते शेंड्याचीमेट येथे घरी परत आले व कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला.

Crime News
Maharashtra Contractors Pending Payments : राज्यात कंत्राटदारांची ८६ हजार कोटींची देयके प्रलंबित

याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात संबधीत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित सुनिल साबळे हे करीत आहेत. या घटनेत आदिवासी कातकरी समाजावर झालेला अन्याय अत्यंत गंभीर असून, श्रमजीवी संघटनेने वेळीच धाव घेऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न व पोलीसांनी दाखवलेली संवेदनशीलता व तात्काळ कारवाई ही निश्चितच कौतुकास्पद आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news