Latur News : चार तासांत पोलिसांनी लावला 'त्या' अमानुष मारहाणीचा छडा !

समाजमाध्यमांवरील चित्रफितीची तातडीने दखल; एकास अटक, तत्परतेचे स्वागत
Latur News
Latur News : चार तासांत पोलिसांनी लावला 'त्या' अमानुष मारहाणीचा छडा !file photo
Published on: 
Updated on: 

Within four hours, the police cracked the case of 'that' brutal assault!

लातूर, पुढारी वृत्तसेवा : एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला नग्न करून त्याच्या पार्श्वभागावर पेट्रोल टाकून पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. या चित्रफितीची पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी गंभीर दखल घेत तातडीने तपासाचे निर्देश दिले. एमआयडीसी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासांत प्रकरणाचा माग काढला आणि एका संशयिताला अटक केली. सुरज बसवेश्वर बर्दापूरे असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Latur News
Latur Crime : जुगार अड्ड्यावर धाड; ३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान चवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चित्रफीत जून महिन्यातली असून रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली चित्रफीत पाठवून पीडित विद्यार्थी आणि संशयितांचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले.

अप्पर पोलिस अधिक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने तपास सुरू केला. चित्रफितीत अल्पवयीन विद्यार्थ्याला नग्न करून त्याच्या पार्श्वभागावर पेट्रोल टाकून पट्ट्याने मारहाण केली जात असल्याचे दिसत होते. घटनास्थळ आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू करून पीडिताचा शोध घेतला. आरोपीही निष्पन्न झाले. दरम्यान तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थ्याला लातूरमधील एका महाविद्यालयासमोरून दुचाकीव जबरदस्तीने बसवून कळंब रेल्वे गेट परिसरात नेण्यात आले. तेथे त्याचे कपडे काढून पाण्याच्या बाटलीतून पार्श्वभागाव पेट्रोल टाकण्यात आले.

तसेच छाती-पोटावर बसून पट्ट्याने त्याला अमानुष्ष मारहाण करण्यात आली. यावेळी य मारहाणीची चित्रफीत तयार करून त समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याच धमकी पीडिताला देण्यात आली. य धमकीच्या आधारे विद्यार्थ्याकडून दहा हजा रुपये जबरदस्तीने घेतल्याचेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे. या प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात चान तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण, मारहाण जबरदस्तीने पैसे घेणे आणि पोक्स कायद्यांतर्गत तरतुदींनुसार कारवाड करण्यात येत आहे. एका संशयिताला अटक करण्यात आली असून, अन्य संशयितांच शोध सुरू आहे.

Latur News
Latur News : रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून स्वागत

समाजमाध्यमांवरील चित्रफितीची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी एमआयडीसी पोलिसांना तातडीने तपासाचे निर्देश दिले. पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चवरे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पीडिताचा शोध घेतला. तक्रार नोंदवून एका संशयिताला अटक करण्यात आली असून, उर्वरित संशयितांनाही लवकर अटक करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news