

पालघर : हनिफ शेख
मोखाडा शहरात सिंचनाच्या नावाखाली अनेक धरणे बांधणे गेली. तब्बल 25 ते 30 वर्षांपूर्वी बांधली गेलेली धरणे आजवर त्याचा कोणाला आणि कशासाठी उपयोग झाला याचा तपास केल्यास मोठा सिंचन घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील प्रतिनिधिक स्वरूपात पाहिल्यास तालुक्यातील पळसपाडा गावानजीक असलेला वाघ प्रकल्प होय.
1994 च्या दरम्यान या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आज 30 ते 32 वर्ष झाल्यानंतर देखील या धरणाचा नेमका सिंचनासाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग झाला का हा संशोधनाचा भाग बनला आहे कारण की या धरणाचे पाणी कालव्यांद्वारे धरण ऊद्भवच्या ठिकाणापासून ते मोखाडा शहरातील टाकपाडा या ठिकाणापर्यंत येणार होते. मात्र अद्याप पर्यंत कालव्याचेच काम पूर्ण न झाल्याने तिथपर्यंत पाणी येणे सोडा निम्म्यापर्यंत देखील पाणी आले नाही .
अशातच या धरणाला देखील गळती लागल्याचे चित्र आहे आणि पाटाला देखील गळती लागलेली आहे यामुळे या सिंचनाच्या नावाखाली धरणाची निर्मिती केली तो उद्देश पूर्ण झालात नाही मात्र अशा परिस्थितीत कागदोपत्री या धरणाचा उपयोग दाखवून धरण बांधल्यानंतर काही वर्षातच पाटांची दुरुस्ती आणि धरणाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याची दिसून येत आहे. तीस वर्षांपूर्वी मोखाडा तालुक्यातील पोशारा ग्रामपंचायत मधील पळसपाडा या भागात वाघ प्रकल्प म्हणून धरणाची निर्मिती करण्यात आली. यातून कालव्याद्वारे गोंदे गावाजवळून तोरण शेत जव्हार फाटा तेलीपाडा या मार्गे लोहार पाड्याच्या नजीकून टाक पाडा असा हा कालवा बनवण्यात आला.
या धरणाचा उद्देशच हा होता की बारा महिने या पाठांमध्ये पाणी राहील आणि धरण आणि पाटांच्या आजूबाजूच्या शेतीला मुबलक पाणी मिळेल त्यातून बारमाही शेती या भागातील शेतकरी करू शकतील मात्र धरण निर्मिती ते आज टायगर या कालव्यांद्वारे पाणी शेवटच्या पाड्यापर्यंत पोहोचलेच नाही एवढेच काहीतरी निम्म्यापर्यंत देखील पोहोचले नाही कारण की निर्मितीनंतर काही वर्षातच धरणाला देखील गळती लागली आणि पाटाला देखील गळती लागल्याचे चित्र आज घडीला दिसून येत आहे.
यामुळे शेती करणे लांब राहिले उलट धरण आणि पाटांच्या आजूबाजूच्या शेतात गळतीचे पाणी बारा महिने साचून उलट येथील शेती नापिक होण्याची भीती निर्माण झाली. आणि निम्म्याहून जास्त कालव्यांचे काम पूर्ण झालेच नाही फक्त खोदकाम करून ते काम तसेच सोडण्यात आले. यामुळे सिंचनासाठी हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण झालाच नाही असे चित्र असताना दुसरीकडे मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आजपर्यंत दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी पुन्हा कुठेतरी रुपये खर्च होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामुळे या धरणाबरोबरच मोखाडा तालुक्यातील इतर धरणांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची देखील चौकशी होणे आवश्यक आहे. मुळात जलसंपदा विभागाकडे या धरणांचे दुरुस्तीचे काम असते मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
नियोजनाचा अभाव
मुळात या धरणाचे काम झाल्यानंतर त्याचवेळी पाटाचे देखील काम करण्यात आले. मात्र यासाठी जो नियोजित मार्ग निवडला गेला त्याचे व्यवस्थित भूसंपादन केले नाही शेतकरी किंवा जागा मालकाला त्याची माहिती देण्यात आली नाही आणि या पाठाच्या खोदण्याचे काम एवढ्या संततीने करण्यात आले की ते काम पूर्णत्वास जाण्याच्या अगोदर या मार्गात अनेकांनी आपली घरे बांधली तर काहींनी आपली शेतीला सुरुवात केली यामुळे या पाटाचे बऱ्याचदा मार्ग देखील बदलण्यात आले. आणि असे करूनही आजवर शेवटपर्यंत हा पाठ किंवा यातून पाणी तिथपर्यंत पोहोचलेच नाही.
प्रकल्पाचे पाणी मोखाडा शहराला
धरणाचा सिंचन किंवा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग झाला नसला तरी आता मोखाडा नगरपंचायतीसाठी 34 कोटीहून अधिक रकमेची पाणीपुरवठा योजना होणार आहे. यासाठी मोखाडा शहराला लागणारा पाणीपुरवठा या धरणातून होणार आहे यामुळे या धरणाचा 30 ते 32 वर्षानंतर पहिल्यांदाच चांगला उपयोग होणार असल्याचे दिसून येत असले तरी या पाटातून लागलेली गळती आणि धरणाची गळती याची सांगड घालून शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी धरणाचं व्यवस्थित असणं आवश्यक आहे.