Palghar Liquor Smuggling : दमण बनावट दारू विरोधात उत्पादन शुल्कची कारवाई

३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
Palghar Liquor Smuggling
दमण बनावट दारू विरोधात उत्पादन शुल्कची कारवाईpudhari photo
Published on
Updated on

पालघर : राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि भरारी पथकाने डहाणू आणि जव्हार तालुक्यात गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध मद्य तस्करीचा मोठा डाव उधळला आहे. ११ जून २०२६ रोजी डहाणू आणि जव्हार परिसरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून तस्करी रोखण्यात आली. तीन वाहने ताब्यात आली. दादरा नगर हवेली, दीव आणि दमण येथून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला.

उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहिती नुसार, कारवाईत एकूण रु. ३४,८०,५२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या १४२ बॉक्स विदेशी मद्याचा अंदाजे बाजारभाव रु. १०,१०,५२०/- आहे. या प्रकरणी तीन वाहने ताब्यात घेतली गेली आहेत. या प्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Palghar Liquor Smuggling
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्हा अधीक्षक गणेश बारगजे आणि उपअधीक्षक अविनाश रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली, डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे, विकास आबनावे, अभिजित मानकर, आणि टी.व्ही. सावेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

Palghar Liquor Smuggling
Illegal Liquor Raid: रायगडमध्ये वर्षभरात 8 कोटींचा अवैध मद्याचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जिल्ह्यात अवैध मद्य तस्करीवर कारवाई सतत सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना उत्पादन शुल्क विभागाच्या गस्ती पथका मार्फत लक्ष ठेवले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news