राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dhule news | अवैध दारू कारखान्यावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

धुळे

सोनगीर : शिरपुर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. अवैध दारू कारखान्यावर छापा टाकून तब्बल ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरपुर तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क पथकाला अवैध चालू असलेल्या कारखान्याबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक देविदास नेहुल यांच्या पथकाने शिरपुर तालुक्यातील अंबादुकपाडा परिसरात सापळा रचून छापा टाकला. छाप्यामध्ये ९० ML च्या ५१ सीलबंद बनावट देशी दारूच्या बाटल्या, १०० लिटर तयार बनावट दारू, ५०० लिटर स्पिरिट, १८ हजार रिकाम्या बाटल्या, ८ प्लास्टिक टाक्या तसेच एक स्विफ्ट डिझायर कार असा मोठा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सुलतानपूर शहादा येथील अजयसिंह उखळदे , मनोहर पिंपळदे आणि मोगा मुसळदे या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना शिरपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बनावट दारू निर्मिती आणि विक्रीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news