Ladki Bahin Yojana: पालघरमधील लाडक्या एक लाख बहिणी योजनेला मुकणार; चौकशीची मागणी

कार्यालयात खेटा मारूनही ई-केवायसी नाही
ladki bahin yojana
ladki bahin yojanaPudhari
Published on
Updated on

नविद शेख

पालघर: राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या इ-केवायसी प्रक्रियेला मुदत वाढ दिली असली तरीही 31 डिसेंबर 2025 या मुदतीत इ-केवायसी केलेल्या महिलांना दुरुस्तीची संधी देण्यात आल्याने 31 डिसेंबरच्या मुदतीत इ-केवायसी न केल्याने लाभ मिळणे बंद झालेल्या शेकडो महिला पालघर जिल्हा मुख्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयात चकरा मारत असल्याचे चित्र आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी योग्य माहिती आणि अज्ञानामुळे खाते असलेल्या बँकेत जाऊन इ-केवायसी पूर्ण केली परंतु लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरील इ-केवायसी करणे राहून गेल्याने लाभ मिळणे बंद झालेल्या महिलांची संख्या एक लाखा पर्यंत असल्याचे बोलले जात आहे. इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याने हताश होऊन शेकडो महिला माघारी फिरत आहेत.

ladki bahin yojana
Chicken Price Increase: शेतकऱ्यांसह शहरातील व्यावसायिकांना कुकुटपालन ठरतेय वरदान

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यातील सहा लाख 24 हजार 659 लाभार्थी महिलांपैकी इ-केवायसी अभावी लाभ बंद झालेल्या महिलांची संख्या सांगण्यात जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे बोट दाखवले. त्यामुळे 31 डिसेंबरच्या मुदतीमध्ये ई केवायसी केलेल्या 65 हजार 502 लाभार्थी महिला आणि 31 डिसेंबरच्या मुदतीत इ केवायसी करण्यात अपयशी ठरलेल्या महिला मिळून जिल्ह्यातील एक ते दीड लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणे बंद झाले आहे.

पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाडकी बहीण पोर्टल वरील तीन लाख 38 हजार तर नारीशक्ती दूत ऍप वरील दोन लाख 85 हजार 857 मिळून सहा लाख 24 हजार 659 लाभार्थी आहेत.आतापर्यंत 254 लाभार्थ्यांनी स्वतःहून लाभ सोडला आहे. तर 65 हजार 502 लाभार्थी महिलांना 30 एप्रिल 2026 च्या मुदतीत इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 च्या मुदतीत इ-केवायसी प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाइन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. 30 एप्रिल 2026 पर्यंत इ-केवायसी करता येणार आहे.यापुढे कोणत्याही परिस्थिती सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नसल्याचे शासन स्तरावरून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी इ-केवायसी माध्यमातून 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार ऑथेंटीकेशन द्वारे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणीसाठी ऑनलाइन इ-केवायसी मध्ये सुधारणा करण्याची संधी देण्याची मागणी योजनेचे लाभार्थी आणि क्षेत्रीय कार्यालयातून होत असल्यामुळे ऑनलाईन केवायसी मध्ये पुन्हासुधारणा करण्यासाठी संधी 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आली होती.

ladki bahin yojana
Teacher Recruitment: शिक्षक भरतीत शैक्षणिक पात्रतेला अधिक वजन; उच्च पात्र उमेदवारांना संधी

त्यानंतर ही योजनेच्या लाभार्थ्यांकडून ऑनलाईन इ-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याच्या मागणी नुसार 30 एप्रिल 2026 पर्यंत इ-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून 02 एप्रिल 2026 रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

65 हजार लाभार्थ्यांची इ-केवायसी प्रलंबित

पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सहा लाख 24 हजार 659 लाभार्थी आहेत. आतापर्यंत 254 लाभार्थ्यांनी लाभ सोडला आहे. तर 65 हजार 502 लाभार्थ्यांची इ-केवायसी प्रलंबित आहे. परंतु 31 डिसेंबर 2025 या मुदतीत इ-केवायसी न केलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या शेकडो महिला पालघर जिल्हा मुख्यालयातील महिला बालकल्याण विभागाचा कार्यालयात चकरा मारत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news