Tarapur MIDC Explosion : बोईसरच्या तारापूर एमआयडीसीत केमेट इंडस्ट्रीजमध्ये स्फोट

रिॲक्टरमध्ये झाला स्फोट; दोन कामगार गंभीर जखमी, दोन किलोमीटरपर्यंत हादरे
Tarapur MIDC Explosion
Tarapur MIDC Explosionpudhari photo
Published on
Updated on

बोईसर : जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक एन-७४/१ वरील केमेट इंडस्ट्रीज या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यात बुधवारी रिऍक्टरमध्ये अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की परिसरातील अनेक उद्योगांसह निवासी भागांमध्येही त्याचे हादरे जाणवले. अचानक झालेल्या या घटनेमुळे कामगार आणि नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या दोन कामगारांना त्वरित बाहेर काढून उपचारासाठी बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Tarapur MIDC Explosion
Hingoli Crime | वारंगा फाटा येथे २.३४ कोटींची सुपारी जप्त, आठ जणांविरुद्ध गुन्हा

घटनेनंतर कारखान्याच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचे उपाय करण्यात आले असून संबंधित विभागांकडून रिऍक्टरमध्ये स्फोट होण्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार रासायनिक प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी अधिकृत कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

तारापूर एमआयडीसीमध्ये गेल्या काही वर्षांत रासायनिक उद्योगांमध्ये आग, स्फोट आणि गॅस गळतीसारख्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक कारखान्यांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन, यंत्रसामग्रीची नियमित देखभाल, आपत्कालीन यंत्रणा आणि सुरक्षा प्रशिक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Tarapur MIDC Explosion
Pimpri Underpass Safety Issue: पिंपरीतील बोगदे व अंडरपास धोकादायक; खड्डे, अंधार आणि तुटलेल्या काँक्रीटमुळे अपघाताचा धोका

दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून स्फोटाचे नेमके कारण, झालेल्या नुकसानीचा अंदाज आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचा सर्वंकष तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

केमेट इंडस्ट्रीजच्या सुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी

या घटनेनंतर स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना तसेच कामगार संघटनांकडून केमेट इंडस्ट्रीजमधील सुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच तारापूर एमआयडीसीतील सर्व धोकादायक रासायनिक उद्योगांचे सुरक्षा ऑडिट करून निष्काळजीपणा करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news