Hingoli Crime | वारंगा फाटा येथे २.३४ कोटींची सुपारी जप्त, आठ जणांविरुद्ध गुन्हा

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई
Akhada Balapur Betel Nut Seized
आठ जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेPudhari
Published on
Updated on

Hingoli Akhada Balapur Betel Nut Seized

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत तब्बल २ कोटी ३४ लाख ६४ हजार १६० रुपयांची संशयित सुपारी जप्त केली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नागपूर रोडवरील वारंगा फाटा येथील हॉटेल बाबा रामदेव शुद्ध शाकाहारीच्या पार्किंग परिसरात ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संशयित वाहनांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सुपारीचा साठा आढळून आला. संबंधित सुपारी मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन, हिंगोली येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी दुर्गार श्रीराम घोगे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे.

Akhada Balapur Betel Nut Seized
Hingoli News | आधुनिकतेच्या झगमगाटात सुतारकी व्यवसाय संकटात; कारागिरांवर मजूर बनण्याची वेळ

आठ जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणात बाळा तुकाराम शिंदे (रा. जोगेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), सुरेश अंकुश शिंदे (रा. निरवली, ता. जामखेड, जि. अहमदनगर), अशोक बबनराव शिंदे (रा. जोगेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), श्री शिवा ट्रेडर्स (शिवमोग्गा), यशसी ट्रेडर्स (शिवमोग्गा), गणपती प्रोडक्ट्स (छत्तीसगड), डिलाईट ट्रेडर्स (दिल्ली) आणि श्री श्रीधर ट्रान्सपोर्ट (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन ट्रकमधून १,२६५ गोण्या जप्त

कारवाईदरम्यान तीन ट्रकमधून एकूण १,२६५ गोण्या सुपारी जप्त करण्यात आल्या. यात वाहन क्रमांक एमएच ४० बीएफ ९९१८ मधून ४१५ गोण्या (२९,०४८ किलो), एमएच ४० बीएफ ९९०९ मधून ४२० गोण्या (२९,३९८ किलो) आणि केए ७० ४२०५ मधून ४३० गोण्या (३०,०९८ किलो) सुपारी आढळून आली.

जप्त करण्यात आलेल्या सुपारीचे एकूण वजन ८८ हजार ५४४ किलो असून तिची बाजारमूल्य अंदाजे २ कोटी ३४ लाख ६४ हजार १६० रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Akhada Balapur Betel Nut Seized
Hingoli news | दोन दिवसांपासून रजिस्ट्री ठप्प; दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त

सार्वजनिक आरोग्याशी खेळल्याचा आरोप

आरोपींनी संगनमत करून मानवी सेवनासाठी असुरक्षित सुपारीची वाहतूक, खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. ग्राहकांची फसवणूक करून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१२/२०२६ नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक एस. मरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपी क्रमांक १ ते ३ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या या कारवाईमुळे अवैध व संशयित अन्नपदार्थांच्या व्यवहारात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news