Palghar Protest : संविधान दिनी वाढवण बंदरविरोधी आंदोलनाचा एल्गार

३०० महिला पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांनी रॅली रोखल्याने तणाव
Palghar Protest
Palghar Protestpudhari photo
Published on: 
Updated on: 

डहाणू : वाढवण बंदर आणि ग्रीनफिल्ड महामार्गा विरोधात वरोर येथे सुरू असलेल्या आंदोलनाने संविधान दिनी आक्रमक वळण घेतले. वाढवण बंदर विरोधी ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले व त्यांचे कार्यकर्ते, आणि महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवार दि. २६ रोजी संविधान रॅली काढण्यात आली.

हातात संविधानाच्या प्रती घेऊन निघालेल्या आंदोलकांनी ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी रॅलीला अडविल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी पोलिसांनी सुमारे ३०० महिला आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे वरोर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Palghar Protest
Jalna News : वडीगोद्री परिसरातील कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद

वाढवण बंदर प्रकल्पासह ग्रीनफिल्ड महामार्गाला विरोध करण्यासाठी परिसरातील भूमिपुत्र, कोळी बांधव आणि शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. वरोर येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीच्या माध्यमातून जोड देण्यात आली. या रॅलीत आमदार विनोद निकोले, माकपचे कार्यकर्ते, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि महिला आंदोलक सहभागी झाले होते.

रॅली दरम्यान आंदोलकांनी संविधानाच्या प्रती हातात घेतल्या होत्या. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत प्रकल्प विरोधी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Palghar Protest
Mira Bhayandar Municipal Corporation : मिरा-भाईंदर महापालिकेत शाकाहार, मांसाहाराचा दुजाभाव

दरम्यान, रॅलीतील महिला आंदोलकांनी ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन विरोध नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यामुळे आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सुमारे ३०० महिला आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनाची व्याप्ती लक्षात घेता वरोर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संविधान दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या रॅलीतून आंदोलकांनी वाढवण बंदर आणि ग्रीनफिल्ड महामार्ग या दोन्ही प्रकल्पांना विरोध कायम असल्याचे दाखवून दिले. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आधार घेत प्रकल्प विरोधी लढा पुढे सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे वाढवण बंदर विरोधातील ठिय्या आंदोलना सोबतच ग्रीनफिल्ड महामार्गाच्या कामालाही विरोध अधिक तीव्र होत असल्याचे आजच्या घडामोडींमधून दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.