Wada Housing Scheme Fraud : घरकुलाच्या आमिषाने आदिवासींना लाखोंचा गंडा

राजकीय पक्षाच्या ठकसेनाविरोधात गुन्हा दाखल
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

वाडा : घरकुल योजनेअंतर्गत घर मिळवून देण्याच्या भूलथापा देऊन लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका पक्षाच्या कार्यकर्त्याविरोधात वाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शंभराहून अधिक गोरगरीब आदिवासींची या ठकसेन कार्यकर्त्याने फसवणूक करत त्यांना लाखों रुपयांना गंडा घातल्याचे तक्रारीत नमूद असून वाडा पोलिस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

राजकीय पक्षात महत्वाच्या पदी असणाऱ्या या कार्यकर्त्यांसह त्याच्या सहकाऱ्याने वाडा, विक्रमगड, जव्हार व पालघर तालुक्यातील गोरगरीब आदिवासींना शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळवून देतो असे सांगितले.

Fraud Case
Manwat Murder Case | अंगाचा थरकाप उडविणारे हत्याकांड; मानवत मर्डर्स! अंधश्रद्धेचा रक्तरंजित इतिहास

जवळपास ११५ आदिवासींकडून प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे जवळपास २३ लाखांना गंडा या दोघांनी घातला असा त्यांच्यावर आरोप आहे. २०२३- २४ मध्ये या दोघांनी विविध आदिवासी गाव पाड्यांमध्ये बैठका घेवून घरकुल मिळवून देण्याच्या आमिषाने भोळ्याभाबड्या आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना पैसे देण्यास भाग पाडले.

वाडा तालुक्यातील वरले, मांगरूळ, वाडा तर विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी, खांड, दादडे, सवादे, मोह, टेटवाली, साठेपाडा, उघाणीपाडा, आलोंडे, सातकोर, उपराळे, आदि तसेच जव्हार व पालघर तालुक्यातील आदिवासींचा यात समावेश आहे. पैसे देऊनही लाभ कुणालाही मिळत नसल्याने पीडितांनी अखेर वाडा पोलीस ठाणे गाठले. दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना जामीन देखील मंजूर झाल्याची माहिती आहे.

Fraud Case
Fraud Case : मंत्र्यांशी ओळख' सांगून तरुणाला २१ लाखांचा गंडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news