Matrimonial App Fraud : लग्न जुळविण्याच्या ॲपवरून ओळख वाढवून फसवणूक

विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Matrimonial App Fraud
Matrimonial App Fraudfile photo
Published on
Updated on

नालासोपारा : विरार पूर्वेकडील शिरगांव येथे सोशल मिडीयावरील लग्न जुळविण्याच्या ॲपच्या माध्यमातून ओळख करून देत स्वतः अविवाहित असल्याचे भासवून प्रेमाचे नाटक करत लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल सांगवेकर नामक महिलेने लग्न जुळविण्याच्या ॲपद्वारे फिर्यादी अरविंद पाटील 35 यांच्याशी ओळख वाढवून स्वतः विवाहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून खोटेपणाने लग्नाचा बनाव करत फिर्यादी अरविंद यांचा विश्वास संपादन केला. या काळात आरोपीने फिर्यादीकडून 3 तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे पैंजण व चांदीची जोडवी घेतली.

Matrimonial App Fraud
Mumbai Air Pollution : मुंबईत 7 वर्षांतील सर्वाधिक प्रदूषण

तसेच कामाच्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी एकूण 4 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगून आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 35,000 रुपये घेतले. मात्र ही रक्कम परत न देता तसेच दागिने स्वतःकडेच ठेवून आरोपीने पैशांचा अपहार करून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप स्पष्ट करण्यात आला आहे. फिर्यादी अरविंद पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.

Matrimonial App Fraud
Matheran Road Cement Blocks : माथेरानच्या रस्त्यावर पुन्हा सिमेंट ब्लॉक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news