Mumbai Air Pollution : मुंबईत 7 वर्षांतील सर्वाधिक प्रदूषण

7 वर्षांत प्रथमच एक्यूआयने घातक हवेची पातळी गाठली
Mumbai Air Pollution
मुंबई : मुंबईच्या ढासळत्या वायू प्रदूषणाचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत असून, घरघर लागण्यासह श्वास घेण्यास त्रास होणे, छाती भरून येणे आणि वारंवार खोकल्याचा त्रास वाढत चालला आहे.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमधील सध्याचे प्रदूषण हे गेल्या 7 वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक प्रदूषण आहे.

मुंबईत शनिवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा 174 इतका नोंदला गेला. आर्य चाणक्य नगर (181), अंधेरी पूर्व (161), अणुशक्तीनगर (173), आरामनगर (186), वांद्रे पूर्व (172), बीकेसी (171), बोरिवली पूर्व (171), बोरिवली पश्चिम (176), चेंबूर (176) अशी एक्यूआय पातळी शनिवारी नोंदवली गेली. चांदिवलीत तर 238 एक्यूआय नेोंदवला गेला.

Mumbai Air Pollution
BJP Gains Control of BMC : मुंबई महापालिका तिजोरीच्या चाव्या भाजपकडेच

2020 ते 2026 या कालावधीचा आढावा घेतल्यास 7 वर्षांपूर्वी याच महिन्यात सरासरी 91 इतका एक्यूआय होता. पुढील दोन वर्षांत तो शंभरीपार गेला. त्या पुढील तीन वर्षे सरासरी 100 ते 114 इतका हवा गुणवत्ता निर्देशांक राहिला. यंदा त्यात कमालीची वाढ झाली आहे. 7 वर्षांत प्रथमच एक्यूआयने घातक हवेची पातळी गाठली.

Mumbai Air Pollution
ZP PS Election Voting : झेडपी, पंचायत समित्यांसाठी राज्यात 66% मतदान

सध्याची स्थिती पाहता जगभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबई 157व्या स्थानी आहे. वाढते प्रदूषण हे आरोग्यासाठी घातक आहेच. मात्र, सध्या श्वसनाशी संबंधित आजारामध्ये वाढ झाली आहे. त्यातच एक्यूआय हा 150-301 दरम्यान असल्यास दम्याच्या लक्षणांचा धोका जास्त असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news