Matheran Road Cement Blocks
माथेरानच्या रस्त्यावर पुन्हा सिमेंट ब्लॉकpudhari photo

Matheran Road Cement Blocks : माथेरानच्या रस्त्यावर पुन्हा सिमेंट ब्लॉक

न्यायालयाच्या आदेशाला दिली बगल; सर्वत्र आश्चर्य व्यक्त; चौकशी होणे गरजेचे
Published on

माथेरान ःमिलिंद कदम

माथेरानमध्ये संनियंत्रण समितीने सिमेंट ब्लॉकसाठी मनाईकेली होती. नगरपालिका प्रशासनाचे हातवरकेलेआहे.कारवाई होणार का याकडे स्थानिकांचे लक्ष, याप्रकरणात खासगी मालमत्तेधारकांना कोणाचे अभय आहे, असाप्रश्नउपस्थितकेला जात आहे.

माथेरानमध्ये एका खासगी मालमत्ता धारकाने आपल्या बंगल्याकडे जाणाऱ्या नगरपालिकेच्या रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता सिमेंट ब्लॉक वापरून रस्ता बनवला असल्याचे उघड झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सिमेंट ब्लॉक माथेरानमध्ये आलेले असताना त्याची कोणतीही चौकशी न होता इथपर्यंत आलेच कसे व हा रस्ता होताना नगरपालिका कर्मचाऱ्यांना याबाबत काही ही भनक लागली नाही. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे,

Matheran Road Cement Blocks
Thane Crime : शहापूरात वनक्षेत्रात गावठी दारूच्या भट्ट्यांची चलती

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल येऊन पडला असून बांधकामाला पूर्व परवानगी असल्याशिवाय माथेरानमध्ये बांधकाम करता येत नाही. परंतु येथे मोठ्या प्रमाणात रेती सिमेंट दगड व सिमेंट ब्लॉक येऊन पडले असून माथेरान प्रवेशद्वारावर बांधकामाचे साहित्य गावामध्ये पाठवायचे असेल तर त्यास शासन मान्यता असेल तरच पाठवता येते व हे तपासण्या करीत आहे.

Matheran Road Cement Blocks
Janakavi P Savlaram : पी. सावळाराम आणि ठाणे

एक कर्मचारी सदैव तैनात असते परंतु या ठिकाणी हे बांधकाम साहित्य कोणाच्या सांगण्यावरून पाठविण्यात आले याची चौकशी होणे गरजेचे आहे. माथेरानमध्ये पर्यावरणवादी संघटनांनी सिमेंटचे रस्ते माथेरान करता घातक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर येथे सिमेंट ब्लॉक वापरण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली होती, परंतु या ठिकाणी न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत मोठ्या प्रमाणात सिमेंट ब्लॉक लावून रस्ता बनविण्यात आला आहे. व हे काम जवळजवळ पंधरा दिवस सुरू होते, पण या ठिकाणी एकही कर्मचारी फिरकला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • माथेरानच्या मुख्य रस्त्यावर वापरण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉकचा दर्जा खराब असल्याचे कारण सांगून हे ब्लॉक संपूर्ण उखडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मग आता या सिमेंटच्या ब्लॉक बाबतही अशीच मागणी होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. माध्यमांनी याबाबत माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन या वरती निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news