Western Railway services : पश्चिम रेल्वेवर 1 फेब्रुवारीपासून चार नवीन लोकल सेवा

दररोज 30 ते 40 हजार प्रवाशांची वाढ होणार
Western Railway services
पश्चिम रेल्वेवर 1 फेब्रुवारीपासून चार नवीन लोकल सेवाpudhari photo
Published on
Updated on

सफाळे : 1 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेने विरार-चर्चगेट मार्गावर अप व डाउन दिशेने प्रत्येकी दोन अशा एकूण चार नवीन लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आणखी 4 ते 6 नवीन सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या नव्या सेवांमुळे 60 किलोमीटर लांबीच्या चर्चगेट-विरार मार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमतेत दररोज सुमारे 30,000 ते 40,000 प्रवाशांची वाढ होणार आहे. मात्र, या नव्या सेवांमध्ये विरार-डहाणू मार्गावरील लोकल फेऱ्यांचा समावेश न झाल्याने या मार्गावरील प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

विरार-डहाणू मार्गावरील प्रवासी संघटनांच्या मते, हा निर्णय या मार्गावरील प्रवाशांबाबत रेल्वे प्रशासनाकडून होत असलेल्या सावत्र वागणुकीचे द्योतक आहे. डहाणूवैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सहसचिव प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी सांगितले की, ‌‘आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन या मार्गावर अधिक लोकल सेवा सुरू करण्याची, अथवा किमान गर्दीच्या वेळेत 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांच्या करण्याची मागणी केली आहे. याचा विरार-डहाणू मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.‌’

Western Railway services
Kelwe beach accident : केळवे समुद्रकिनारी अपघातप्रकरणी घोडागाडी मालकाविरोधात गुन्हा दाखल

गेल्या काही वर्षांत 60 किलोमीटर लांबीच्या विरार-डहाणू मार्गावरील दैनंदिन प्रवाशांची संख्या 1.25 लाखांवर पोहोचली आहे. सध्या पश्चिम रेल्वे या मार्गावरील विविध स्थानकांना विरार-चर्चगेट मार्गाशी जोडणाऱ्या लोकल व शटल गाड्यांसह 60 हून अधिक सेवा चालवत आहे. 1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार नवीन सेवा या 12 डब्यांच्या नॉन-एसी असणार असून त्यापैकी दोन सेवा भाईंदर-वांद्रे दरम्यान, तर उर्वरित दोन सेवा भाईंदर-चर्चगेट दरम्यान धावणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागातील एकूण लोकल सेवांची संख्या 1,406 वरून 1,410 इतकी होणार आहे. या सेवांमुळे काही विद्यमान लोकल सेवांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

Western Railway services
Matheran alternative road : पर्यायी रस्त्याची माथेरानकरांना प्रतीक्षाच

दरम्यान, कांदिवली-बोरिवली दरम्यानचा सहावा मार्ग पूर्ण झाल्याने नवीन लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य झाले आहे. सहावा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वांद्रे टर्मिनसकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पाचव्या व सहाव्या मार्गावर वळवण्यात आल्याने परिचालन कार्यक्षमता वाढल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एप्रिलमध्ये 8 ते 12 अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याची शक्यता

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते, एप्रिलमध्ये सुधारित वेळापत्रक लागू झाल्यानंतर 8 ते 12 अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार असून, यापैकी काही सेवा डहाणूपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. या सेवा चर्चगेट-डहाणू किंवा विरार-डहाणू दरम्यान असू शकतात. तोपर्यंत मात्र, डहाणू मार्गावरील प्रवाशांना नव्या सेवांचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात असंतोषाचे वातावरण कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news