Dahanu Crime News: मुल होत नसल्याने टोमणे मारणाऱ्या भावाची भावाकडूनच हत्या

डहाणूतील बेडगाव बोंगेपाड्यातील घटनेने खळबळ
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

कासा: धाकट्या भावाला मुल होत नाही म्हणून मोठा भाऊ नेहमीच त्याची अवहेलना करत असे. याचा राग येवून रविवारी मध्यरात्री धाकट्या भावानेच मोठ्या भावाची लाकडी दांड्याने अमानुष मारहाण करत हत्या केली. या घटनेने डहाणूतील बेडगाव बोंगेपाड्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलीस तपास घेत आहे.

डहाणू तालुक्यातील मोडगाव परिसरातील बेडगाव बोंगेपाडा येथे सख्ख्या भावानेच भावाची लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून वारंवार टोमणे मारल्याच्या रागातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.

Crime News
Mahesh Aher case: महेश आहेरच्या पोलीस कोठडीत वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बारक्या दशमा बोंगे (52) व आरोपी सिताराम दशमा बोंगे (48) हे सख्खे भाऊ आहेत. आरोपीला मूलबाळ होत नसल्याने त्याबाबत दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे मयत वारंवार सांगत होता. या कारणावरून आरोपीच्या मनात संताप निर्माण झाला होता.

9 मे 2026 रोजी रात्री सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास बेडगाव बोंगेपाडा येथे दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपी सिताराम बोंगे याने हातातील लाकडी दांडक्याने मोठ्या भावाच्या पाठीवर जोरदार फटके मारले. त्यामुळे बारक्या बोंगे खाली कोसळले. त्यानंतर आरोपीने पुन्हा पोटावर दांडक्याने मारहाण करत ‌‘आज तुला मारूनच टाकतो,‌’ अशी धमकी दिली. या मारहाणीत मोठ्या भावास गंभीर अंतर्गत दुखापत झाली असून त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Crime News
Aadharwadi jail incident: उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कैद्याने डोक्याने फोडली काच

घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महेर तसेच पोउपनिरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी 11 मे 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी आजच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्याने तात्काळ गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news