Mahesh Aher case: महेश आहेरच्या पोलीस कोठडीत वाढ

आज पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता यावेळी न्यायालयाने अधिक तपासासाठी 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Thane Municipal Corporation news
Thane Municipal Corporation newsPudhari
Published on
Updated on

ठाणे: लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला ठाणे महापालिकेचा माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता यावेळी न्यायालयाने अधिक तपासासाठी 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कासारवडवली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आहेर यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून आहेर हे फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाच्या पथकाकडून तपास सुरू असताना, कोल्हापूर पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान महेश आहेर याला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे आहेर यांना ठाण्यात आणल्यानंतर न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

Thane Municipal Corporation news
Aadharwadi jail incident: उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कैद्याने डोक्याने फोडली काच

कोठडी संपल्याने आज न्यायालयात हजर केल्यानंतर तपासासाठी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली.

कासारवडवली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरारी आलेल्या महेश आहेर यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक करून ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना 11 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी दुपारी महेश आहेर याना पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.

Thane Municipal Corporation news
Indian Pitta bird: पावसाचे संकेत देणारा ‌‘इंडियन पिट्टा‌’ रायगडमध्ये; कर्नाळा जंगलात घुमतोय आवाज

न्यायालयाने सरकारी वकिलाच्या युक्तिवादावरून पोलीस तपास करण्याच्या मुद्द्यावर पोलीस कोठडीत वाढ करीत 14 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीच्या दरम्यान महेश आहेर यांना नाशिक येथे नेऊन चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news