Dahanu Robbery: डहाणूतील ज्वेलर्स दरोडा उघडकीस ; तिघांना अटक; ५१ लाखांचे दागिने जप्त

बंदुकीचा धाक दाखवत लुटले होते ९० लाखांचे दागिने
Dahanu Robbery
Dahanu RobberyPudhari
Published on
Updated on

डहाणू: डहाणू शहरातील ईराणी रोड वरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तीन आरोपींना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ४२८ ग्रॅम वजनाचे ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, डहाणू पोलीस आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त तपासातून हा गुन्हा उघडकीस आला.

२० जुलै रोजी दुपारच्या सुमारास काळे मास्क आणि काळे जॅकेट घातलेले तीन अनोळखी इसम न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये शिरले. त्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने जबरीने घेण्यास सुरुवात केली. दुकानाचे मालक विनय सोनी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींपैकी एकाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली.

आरोपींकडे मोठा लोखंडी सुराही होता. त्यांनी दुकानाच्या काचा फोडून नुकसान केले आणि सुमारे ७०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ९० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच इमिटेशन ज्वेलरी जबरीने चोरून नेली.

Dahanu Robbery
Boisar Chilhar Road Development: बोईसर-चिल्हार रस्ता ‘कायापालटा’ची खरी परीक्षा; १९५ कोटींचा निधी मंजूर

याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानंतर तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली.

तपास पथकांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २७ जुलै रोजी यशवंत सदू चौधरी, ( ४०) याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ३ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अटक आरोपीच्या चौकशीसह माहितीच्या आधारे पोलिसांनी दिपेश गवळी (२२) आणि विशाल चौरे (२३) यांचा शोध घेतला.

Dahanu Robbery
Thane Politics: ठाण्यात महायुतीतच वादाची ठिणगी! भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत; क्लस्टर, करवाढीवरून मतभेद स्पष्टपणे उघड

दोघांना १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींकडे तपास केल्यानंतर ४२८ ग्रॅम वजनाचे ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी मोठ्या प्रमाणात दागिने जप्त झाल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुर शेलार करीत आहेत. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news